Ramesh Tawadkar | गोव्यात तीन ते चार क्रीडा विद्यालये सुरू करण्याचा विचार; मंत्री रमेश तवडकर यांचा विश्वास

Ramesh Tawadkar | मंत्री रमेश तवडकर यांचा विश्वास; पणजी येथे नृत्य नाट्य स्पर्धेचे उद्घाटन
Ramesh Tawadkar
Ramesh Tawadkar
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
शालेय वयात मुलांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळाल्यास हजारो मुले प्रशिक्षित होऊ शकतात. पैकी पाच टक्के मुले जरी क्रीडापटू बनली, तरी उर्वरित मुलांना शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक असलेल्या विविध क्षेत्रांत करिअर करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे राज्यात तीन ते चार क्रीडा विद्यालये सुरू करण्याची इच्छा असल्याचे कला व संस्कृतीमंत्री रमेश तवडकर यांनी गुरुवारी येथे सांगितले.

Ramesh Tawadkar
Water Supply Crisis | मिरामार येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने पणजी शहरात तीव्र पाणीटंचाई; स्थानिकांचे प्रचंड हाल

मुळगाव येथील पांडुरंग राऊत विद्यालयाने कला व संस्कृती संचालनालयाच्या सहकार्याने पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात 'पांडुरंग राऊत स्मृती चॅम्पियनशिप २०२६ - जयघोष वंदे मातरम्' या नृत्यनाट्य स्पर्धेचे आयोजन केले होते.

मंत्री रमेश तवडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर ज्ञानप्रकाश मंडळाच्या अध्यक्षा प्रिया राऊत, व्यवस्थापक दत्ताराम राऊत, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत परब, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष विनोद शिरगावकर, शिक्षिका पौर्णिमा केरकर, धीरज मातोंकर आणि मंगेश परब उपस्थित होते.

Ramesh Tawadkar
Nagali Hills Taleigao | नागाळी हिल्स-ताळगाव येथे शाब्दिक वादातून झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार संशयितांना पणजी पोलिसांकडून अटक

प्रास्ताविकात ज्ञानप्रकाश मंडळाच्या अध्यक्षा प्रिया राऊत यांनी वडिलांचा कार्याचा वारसा आणि विचार पुढे नेण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. या स्पर्धेच्या माध्यमातून वडिलांना आदरांजली वाहण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. 'वंदे मातरम्'मधून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने देशासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

'त्या' तक्रारींची दखल घ्यायला हवी होती

शेळी येथे चिकन सेंटरमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा बुधवारी खून झाला होता. या घटनेबाबत मंत्री तवडकर यांना विचारले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सतत धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार करण्यात आली होती, तर संबंधित अधिकारी आणि यंत्रणेने याची वेळेच दखल घेऊन योग्य ती कारवाई करायला हवी होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

logo
Pudhari News
pudhari.news