Soham Naik Curchorem Case | कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य संशयित सोहम नाईकची कार जप्त

Soham Naik Curchorem Case | केपे न्यायालयाकडून सहा दिवसांची पोलिस कोठडी
Sex Scandal Case
Sex Scandal Case
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

कुडचडे येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने मुख्य संशयित सोहम नाईक याच्याकडील कार जप्त केली आहे. त्याचा मोबाईल फोनही फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक केलेल्या सोहमला मंगळवारी केपे न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Sex Scandal Case
Goa Cyber Crime News | राज्यात सायबर गुन्ह्यांत ६५ टक्के वाढ

या प्रकरणात आतापर्यंत सोहम नाईक याच्याविरुद्ध पाच गुन्हे नोंदविण्यात आले असून, एका १९ वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. तक्रारीनुसार, संशयिताने मैत्री करून विवाहाचे आमिष दाखवत संबंधित युवतीशी जवळीक वाढवली.

त्यानंतर तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, या कृत्यांचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

Sex Scandal Case
Nashik Rickshaw | नाशिकमध्ये रिक्षाचालकांचे हाल! 3 दिवसांपासून गॅसपंप कोरडे; 8 एप्रिलला तीव्र आंदोलनाचा इशारा

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, जुलै २०२४ते ९ मार्च २०२६ या कालावधीत संशयिताने विविध ठिकाणी, विशेषतः केपे तालुक्यातील एका धबधब्याजवळ तसेच इतर एकांत भागात युवतीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची व्याप्ती वाढवत संशयिताची कार जप्त केली आहे. जप्त केलेला मोबाईल फोन फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असून त्यातून व्हिडीओ, फोटो व इतर डिजिटल पुरावे मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news