

पणजी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पूर्वीमध्ये उभारण्यात आलेला उड्डाणपूल शुक्रवारी (दि.११) संध्याकाळी खुला करण्यात आला. पर्वरी येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी वाहनांना झेंडा दाखविला. यावेळी गोवा दमण दिव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष दाद देसाई, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते.
पणजी-म्हापसा दरम्यान महामार्गावर उभारलेला साडेपाच किलोमीटर लांबीचा हा सहापदरी उड्डाणपूल ९ रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा पूल प्रत्यक्ष वाहतुकीसाठी शुक्रवार, दि.११ रोजी संध्याकाळी खुला करण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यामुळे लोकांना पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची प्रतीक्षा होती.
पुलावरून पहिल्यांदा प्रवास करण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता होती. यासाठी दुपारपासून काही जण उद्घाटन स्थळी उपस्थित होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे उड्डाणपुलावरून वाहने सोडण्याचा कार्यक्रम लांबला. तरीही ते तेथे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते. अखेर ६.३० वाजता मंत्री कामत यांनी वाहनांना झेंडा दाखवला. तत्पूर्वी त्यांनी स्वातंत्र्यसैनिक दाद देसाई यांचे स्वागत केले. तसेच काही प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
कुशल जैन यांच्या नावाने फेक व्हॉटस्अॅप
कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या नावाने फेक व्हॉटस्अॅप प्रोफाईल तयार करून अनेकांना मेसेज पाठविण्यात येत आहेत. तो नंबर व्हिएतनाम येथील आहे. कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या नावाने फेक व्हॉटस्अॅप प्रोफाईल तयार करून अनेकांना मेसेज पाठविण्यात येत आहेत. तो नंबर व्हिएतनाम येथील आहे.
स्वातंत्र्यसैनिक पहिले प्रवासी
यावेळी स्वातंत्र्यसैनिक संघटना अध्यक्ष दाद देसाई यांना पुलावरून पहिल्यांदा प्रवास करण्याचा मान मिळाला. यावेळी मंत्री कामत यांना देसाई यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
यात पर्वरीचे आमदार व मंत्री खंवटे यांनीही सहभाग घेतला. त्यावेळी बोलताना त्यांनी वरील भावना व्यक्त केल्या. त्यापूर्वी खंवटे यांनी एका मध्यभागी बसून मुलाखतही दिली. ते म्हणाले की, पर्वरीत गेली अनेक वर्षे वाहतुक कोंडी होत होती. दिवसाला येथून ये जा करणाऱ्या सुमारे ७० ते ७५ हजार वाहनामुळे रस्ता पार करणे शव शक्य होत नव्हते. गोव्याच्या विकासाला मोठा हातभार लावणारे ठरणार असल्याचे खंवटे म्हणाले.
गोव्याच्या विकासाचे दार खुले करणारा प्रकल्प : मंत्री खंवटे
पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्वरी उड्डाणुल हे गोव्याच्या विकासाचे दार खुले करणारा प्रकल्प ठरणार आहे. हा प्रकल्प आपले स्वप्न होते, व ते आता पूर्ण झाले आहे, अशा शब्दांत पर्वरीचे आमदार व पर्यटन मंत्री रोहण खंवटे यांनी भावना व्यक्त केल्या. या उड्डाणपूलाचे उद्घाटन दोन दिवसांपूर्वी झाले होते. तर प्रत्यक्ष वाहतुकीसाठी शुक्रवारी सायंकाळी हा उड्डाणपूल खुला झाला. गेले दोन दिवस या उड्डाणपुलावर फिरणाचा आनंद घेण्यासाठी गर्दी उसळळी होती. गुरुवारी सायंकाळी नागरिकांनी या उड्डाणपुलावर विविध कार्यक्रम व
गोवा स्ट्रीट फेस्टतर्फे आनंदोत्सव
गोवा स्ट्रीट फेस्टने मंगळवारी सायंकाळी एका विशेष सोहळ्यासाठी एकत्र आणले व संगीत, खाद्यपदार्थ, नृत्य आणि गोव्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. रोहन खंवटे यांनीही या उत्सवात सहभाग घेतला. त्यांनी नागरिक आणि मुलांशी संवाद साधला, सेल्फी काढली, गाण्यासोबत तालही धरला. उड्डाणपुलाच्यावर आकाशात उजळलेल्या ड्रोन शोने या उत्सवाची शानदार सांगता झाली