Rajkumar Maithi Bail | जमीन हडपप्रकरणी राजकुमार मैथीला मोठा झटका; मेरशी सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Rajkumar Maithi Bail | जमीन बळकावल्याप्रकरणातील आरोपपत्रावरील सुनावणीस हजर राहत नसल्याने अटक करण्यात आलेल्या संशयित राजकुमार मैथी याचा जामीन अर्ज मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला.
bail
bail file photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
जमीन बळकावल्याप्रकरणातील आरोपपत्रावरील सुनावणीस हजर राहत नसल्याने अटक करण्यात आलेल्या संशयित राजकुमार मैथी याचा जामीन अर्ज मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून त्याच्याविरुद्ध नोंद असलेले गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्याला जामीन मिळाल्यास तो पुन्हा फरार होण्याची शक्यता असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

bail
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

या जमीन बळकावल्याप्रकरणी प्रथमश्रेणी न्यायालयाने संशयित राजकुमार मैथी याला एक लाखाच्या जाचमुचलक्यावर व तत्सम रक्कमेच्या एका हमीदारावर सशर्त जामीन दिला होता. हे प्रकरण सत्र न्यायालयाकडे वर्ग होऊन आरोपपत्रावरील सुनावणीला तो हजर राहत नव्हता.

त्याच्याविरुद्ध प्रोक्लेमेशन जारी करूनही तो न्यायालयात उपस्थित राहिला नव्हता. त्याच्या पत्नीच्या पत्त्यावरही नोटीस जारी करण्यात आली; मात्र ते घर बंद असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे ही नोटीस न्यायालयाकडे परत आली होती. दरम्यान त्याने प्रोक्लेमेशन रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने फेटाळल्यावर त्याला अटक झाली होती.

bail
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

त्याने जामिनासाठी अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्याच्या या अर्जाला सरकारी वकिलांनी जोरदार विरोध केला. त्याला मिळालेला जामीन न्यायालयाने रद्द करून उसकी हमीची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

त्याच्याविरुद्ध विविध पोलिस स्थानकांत फसवणूक व बनवेगिरीच्या सुमारे १० प्रकरणे नोंद आहेत. त्या प्रकरणांमध्येही तो सुनावणीला उपस्थित राहत नाही. अशा परिस्थितीत त्याला जामीन दिला जाऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे जमीन बळकावण्याच्या प्रकरणातील आरोपी राजकुमार मैथी च्या अडचणी वाढल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news