Road Accident | मडगावमध्ये भीषण अपघात! भरधाव मिनीबसच्या धडकेत दवर्ली येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू

Road Accident | अपघातानंतर चालक फरार ; मडगाव पोलिसांकडून शोध सुरू
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
मडगाव शहरातील आके परिसरात भरधाव मिनीबसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या सुरेश गावंडे (रा. दवर्ली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर जखमीला मदत न करता मिनीबस चालक फरार झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

Accident
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

मडगाव शहर पोलिसांनी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५.५५ वाजता आके येथील टी. बी. कुन्हा शाळेजवळ हा अपघात झाला.

आकेहून पॉवरहाऊस जंक्शनच्या दिशेने जाणारी मिनीबस हमीद मेहमूद मामलेकर (रा. आर्ले, फातोर्डा) हा निष्काळजीपणे चालवत होता. त्याच दिशेने होंडा ॲक्टिव्हावरून जाणाऱ्या सुरेश गावंडे यांना मिनीबसने मागून जोरदार धडक दिली. धडकेमुळे गावंडे रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली.

Accident
Konkan Railway: रोहा–मडगाव रेल्वे मार्ग होणार अधिक सक्षम; १४५ टक्के क्षमतेचा ताण

परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), बांबोळी येथे हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मडगाव शहर पोलीस ठाण्याचे हवालदार प्रसन्न प्रभुगावकर यांनी दिलेल्या राज्य तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालक हमीद मेहमूद मामलेकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६ (१) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४ (अ) व १३४ (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. अनुष्का परब पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news