Acquittal Assault Case | मारहाणीच्या खटल्यातून चौघांची निर्दोष मुक्तता

Acquittal Assault Case | कुळे पोलिसांनी दाखल केलेल्या २०२० मधील मारहाण आणि अनधिकृत प्रवेशाच्या खटल्यातून, सांगे येथील अतिरिक्त संयुक्त प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने प्रवीण म्हार्दोळकर उर्फ घाडी, मितेश नाईक, प्रज्योत नाईक आणि साईराज नाईक यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
Acquittal Assault Case | मारहाणीच्या खटल्यातून चौघांची निर्दोष मुक्तता
file photo
Published on
Updated on

सासष्टी : पुढारी वृत्तसेवा

कुळे पोलिसांनी दाखल केलेल्या २०२० मधील मारहाण आणि अनधिकृत प्रवेशाच्या खटल्यातून, सांगे येथील अतिरिक्त संयुक्त प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने प्रवीण म्हार्दोळकर उर्फ घाडी, मितेश नाईक, प्रज्योत नाईक आणि साईराज नाईक यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

Acquittal Assault Case | मारहाणीच्या खटल्यातून चौघांची निर्दोष मुक्तता
Minor Girl Molestation Case | अल्पवयीन मुलीची छेडछाड करून दिली 'संपूर्ण गल्ली जाळून टाकण्याची' धमकी; परिसरात प्रचंड दहशत

१ मे २०२० रोजी आरोपींनी आणि इतरांनी बेकायदेशीर जमाव जमवून तक्रारदाराच्या घरात घुसखोरी केली, तसेच तक्रारदार व एका मजुराला शिवीगाळ करून मारहाण केली, असा आरोप सरकारी पक्षाने केला होता. मात्र, सरकारी पक्ष हे आरोप संशयापलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरला, असे न्यायालयाने नमूद केले.

Acquittal Assault Case | मारहाणीच्या खटल्यातून चौघांची निर्दोष मुक्तता
MLA Viresh Borkar RGP | आमदार वीरेश बोरकरच पडद्यामागील सूत्रधार

साक्षीदारांचे जबाब एकमेकांशी विसंगत होते आणि वैद्यकीय पुराव्यांनीही आरोपांना दुजोरा दिला नाही; एका पीडित व्यक्तीच्या अंगावर कोणतीही दुखापत आढळली नाही आणि तक्रारदाराच्या बाबतीतही दुखापत झाल्याचे सिद्ध झाले नाही, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. नंतर न्यायालयाने सर्व चारही आरोपींची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news