Goa Crime | साळगाव दुहेरी हत्याकांडातील संशयित अटकेत

पैशाच्या वादातून हत्या; ओडिशा येथे जाऊन आवळल्या मुसक्या
Goa Crime
पणजी: रायबंदर येथे माहिती देताना राहुल गुप्ता. बाजूला अधिकारी व तपास पथक.
Published on
Updated on

पणजीः साळगाव येथील दुहेरी हत्याकांडातील संशयिताला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ओडिशा येथे अटक करण्यात आली. गुन्हा शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत त्याबद्दल माहिती दिली.

Goa Crime
Goa News |धार्मिक सलोखा बिघडवू नका

मुख्य संशयित जगन्नाथ भगत (रा. मूळ छत्तीसगड) नोव्हेंबर २०२५ मध्ये गुन्हा केल्यानंतर लगेचच गोव्यातून फरार झाला होता व तेव्हापासून बेपत्ता होता. सातत्यपूर्ण तांत्रिक पाळत आणि सततच्या निरीक्षणाद्वारे त्याचा शोध घेऊन त्याला ओडिशामध्ये अटक करण्यात आली. साळगाव मुद्दावाडो येथील रहिवासी जॉर्ज नोरोन्हा यांनी ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रार दाखल केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले.

नोरोन्हा यांनी पोलिसांना माहिती दिली की, ०५ नोव्हेंबर २०२५ च्या रात्री उशिरा ते ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळच्या दरम्यान साळगाव येथील घर क्रमांक ३/८४ मध्ये रिचर्ड डीमेलो आणि अभिषेक गुप्ता या दोघांची निघृण हत्या करण्यात आली.

Goa Crime
Liquor Ban in North Goa Villages |शिरगावसह सहा गावांमध्ये मद्यविक्रीस बंदी

प्राथमिक तपासात उघड झाले की, दोघांच्या मानेवर आणि शरीराच्या इतर भागांवर धारधार शास्त्राने हल्ला झाल्याने प्राणघातक जखमा झाल्या होत्या. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी तक्रारदाराला त्याच्या भाड्याच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात दोन्ही मृतदेह आढळले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news