Goa Medical College | गोमेकॉच्या विस्तारासाठी 600 कोटींचा निधी; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

Goa Medical College | बांबोळी येथे ४० कोटींच्या लेक्चर हॉलचे उद्घाटन; गोमेकॉत आरोग्य सुविधांचा मोठा विस्तार
Goa Medical College
Goa Medical College
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा वैद्यकीय महाविद्यालय अर्थात गोमेकॉच्या सेवेवर गोव्यासह सिंधुदुर्ग, बेळगाव आणि कारवार जिल्ह्यांतील नागरिकांचा मोठा विश्वास आहे. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी गोमेकॉतील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी सर्वोत्तम सेवा द्यावी. गोमेकॉच्या विविध विभागांचा विस्तार व विकास करण्यासाठी सरकारकडून सुमारे ६०० कोटी रुपये खर्च केले जात असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Goa Medical College
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

बांबोळी येथील गोमेकॉ परिसरात ४० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या तीन व्याख्यान सभागृहांचे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार मायकल लोबो, आरोग्य सचिव यतेंद्र मराळकर, अधिष्ठाता डॉ. जे. पी. तिवारी आदी उपस्थित होते.
गोमेकॉमध्ये मोठे बदल झाले आहेत. नवीन प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून नवीन प्रकल्प उभारले जातील. वसतिगृह, मनोरुग्णालयाचा विकास यासह विविध प्रकल्पांवर सरकारकडून ६०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

गोमेकॉ आणि सुपरस्पेशालिटी विभागाला जोडण्यासाठी उड्डाणपूल किंवा अन्य सुविधा उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. संपूर्ण सुविधा एकात्मिक कॅम्पस म्हणून विकसित करण्याचे नियोजन असून, हे काम लवकरच सुरू होणार आहे.
आमदार मायकल लोबो यांनी गोमेकॉसह प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये पायाभूत सुविधांची कामे सुरू असल्याचे सांगितले. गोमेकॉतील पार्किंगची समस्या लक्षात घेता बहुमजली वाहनतळ उभारण्याचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

१९९१ मध्ये गोमेकॉत प्रवेश मिळाला नव्हता

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या वैयक्तिक आठवणींना उजाळा देताना १९९१ मध्ये गोमेकॉत एमबीबीएस प्रवेशासाठी प्रयत्न केला होता. मात्र, प्रवेश न मिळाल्याने खासगी आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेतल्याचे सांगितले. आता गोमेकॉतील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा वाढल्या असून, त्याचा लाभ गोवेकरांना होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Goa Medical College
CM Pramod Sawant | "फोंड्यासाठी आमदार नसला तरी संपूर्ण जबाबदारी माझीच"; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मोठे स्पष्टीकरण

ऑनलाईन ओपीडी सुरू करा

रुग्णालयातील अनावश्यक फेऱ्या कमी करण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंटनंतर ऑनलाईन ओपीडी प्रणाली सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. रुग्णांनी वैद्यकीय अहवाल ऑनलाईन पाठविल्यास डॉक्टरांना त्यांचे दूरस्थपणे परीक्षण करून आवश्यक उपचार किंवा औषधांची माहिती देता येईल. त्यामुळे ओपीडीवरील भार सुमारे ५० टक्क्यांनी कमी होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी संवादाचे खुले व्यासपीठ

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी गोमेकॉमध्ये नियमित 'टाऊन हॉल' पद्धतीची संवादात्मक सत्रे आयोजित करण्याचे आवाहन केले. जनरेशन झेड आणि जनरेशन अल्फा पिढी अधिक व्यक्त होणारी असल्याने विद्यार्थ्यांना नेते, विभागप्रमुख आणि प्राध्यापकांशी संवाद साधण्यासाठी खुले व्यासपीठ मिळावे, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news