Goa - हरवळे येथे १९ कोटींचा सौर प्रकल्प

स्वच्छ ऊर्जेला चालना; भारत-जर्मन कराराचा भाग
solar project
solar project file photo
Published on
Updated on

पणजी : गोव्यात नवीकरणीय ऊर्जा निर्मिती वाढवण्याच्या प्रयत्नांतर्गत सांखळीतील हरवळे येथे २.२ मेगावॅट पीक (डीसी) आणि १.८ मेगावॅट (एसी) क्षमतेचा जमिनीवर उभारण्यात येणारा सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे, अशी माहिती गोवा ऊर्जा विकास संस्थेच्या (जीईडीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

solar project
Goa MSME upgrade | राज्यातील ३०० एमएसएमईना मेगा अपग्रेड मिळणार

या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे १०.५७ कोटी ते १९.३२ कोटी रुपये असून, दरवर्षी अंदाजे ३,४४७मेगावॅट-तास वीज निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प भारत-जर्मन ऊर्जा कार्यक्रमाचा भाग असून, गोव्याच्या स्वच्छ ऊर्जेच्या उद्दिष्टांना चालना देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक सौर मॉड्यूल्स आणि इन्व्हर्टर्सचा वापर करण्यात येणार आहे. कार्यक्षम सौर पॅनेल बसवून निर्मित वीज सुमारे ७०० मीटर अंतरावरील सांखळी उपकेंद्राशी जोडली जाणार आहे. या प्रकल्पातून निर्मित वीजेचा खर्च प्रति युनिट सुमारे ४.८२ ते ४.४९ रुपये असा अंदाजित आहे. दिवसा निर्माण होणारी अतिरिक्त वीज साठवण्यासाठी ७ मेगावॅट-तास क्षमतेची बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे.

solar project
Goa | चांदेल-हसापूर पर्यायी रस्ता गेला वाहून

हा प्रकल्प कृषी-सौर (अॅग्री-व्होल्टाईक) पद्धतीवर आधारित असून, शेती आणि वीज निर्मिती यांचा समन्वय साधला जाणार आहे. सामान्य परिस्थितीत वीज निर्मितीचा खर्च प्रति युनिट सुमारे ४.८२ रुपये राहील. या दराने किंवा त्यापेक्षा अधिक दराने वीज विक्री झाल्यास प्रकल्पातून स्थिर महसूल मिळू शकतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

प्रस्तावित जागा प्रामुख्याने ओसाड असून तेथे विरळ वनस्पती आहेत. परिसरात कोणतेही मोठे पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र किंवा वन्यजीव संरक्षित क्षेत्र नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news