Goa | चांदेल-हसापूर पर्यायी रस्ता गेला वाहून

चांदेल-हसापूर पर्यायी रस्ता गेला वाहून
पेडणे : चांदेल-हसापूर येथील पर्यायी मार्ग पाण्याखाली गेल्याने
लोकांची गैरसोय होत आहे.
पेडणे : चांदेल-हसापूर येथील पर्यायी मार्ग पाण्याखाली गेल्याने लोकांची गैरसोय होत आहे.
Published on
Updated on

Chandel Hasapur road damage

पेडणे : चांदेल-हसापूर मुख्य रस्त्यावरील नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असले तरी तो अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. पुलाच्या कमानीवर स्लॅब काँक्रीटचे काम झाल्याने काही काळ विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे.

पेडणे : चांदेल-हसापूर येथील पर्यायी मार्ग पाण्याखाली गेल्याने
लोकांची गैरसोय होत आहे.
Goa Samuel Braganza funeral| सॅम्युअल ब्रागांझा याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ताही रविवारी मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नवीन पूल खुले करण्याची मागणी हो आहे.

कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांना आता मिळेल त्या वाटा-रस्त्यांचा वापर करत ढोपरभर पाण्यातून वाहने चालवत प्रवास करावा लागत आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करून नवीन पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली आहे.

रविवारी रात्री काही प्रमाणात पाऊस पडल्याने चांदेल येथील नवीन पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्त्यावर पाणी तुंबले आहे.

पेडणे : चांदेल-हसापूर येथील पर्यायी मार्ग पाण्याखाली गेल्याने
लोकांची गैरसोय होत आहे.
Engineering exports growth | अभियांत्रिकी उत्पादन निर्यातीत 36 टक्के वाढ

नवीन पूल आजपासून सुरू

पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर सोमवारी घटनास्थळाची पाहणी केली. या नदीवर ४० वर्षांपूर्वी सरकारने पूल उभारला होता तो अरुंद पुल आणि कमकुवत झाला होता. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या सहकार्यातून नवीन पूल उभारण्यात आला आहे. कमानीच्या काँक्रीट घातल्यानंतर किमान २२ दिवस जायला हवे होते. मात्र, पर्यायी रस्ता वाहून गेल्यामुळे मंगळवार दि. ९ पासून हलक्या वाहनांसाठी पूल खुला करण्यात येईल, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news