

• रिवोन जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजपच्या राजश्री गावकर १४ मतांनी विजयी.
• गोवा फॉरवर्ड उमेदवाराचा पराभव; मंत्री सुभाष फळदेसाई यांना दिलासा.
• हरमल व कोलवाळ मतदारसंघात अपक्ष उमेदवारांचा पुन्हा विजय.
• बेतकी-खंडोळ्यात अपक्षाच्या विजयामुळे आमदार गोविंद गावडे यांना राजकीय धक्का
पणजी: पुढारी वृत्तसेवा
जिल्हा पंचायतीच्या या निवडणुकीमध्ये अनेक नवे चेहरे विजयी होत असून काही ठिकाणी अपक्षांनी सत्ताधारी भाजपा सोबतच काँग्रेस, आम आदमी पक्ष या पक्षांनाही धक्का दिलेला आहे. सांगे विधानसभा क्षेत्रातील रीवन या जिल्हा पंचायत मतदारसंघातील भाजपा उमेदवार राजश्री गावकर या अवघ्या 14 मतानी विजयी झाल्या आहेत.
त्यामुळे समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांना दिलासा मिळालेला आहे . गोवा फॉरवर्ड च्या उमेदवाराचा त्यांनी पराभव केलेला आहे. दुसरीकडे 2020 मध्ये हरमल जिल्हा पंचायत मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडून आले होते आणि यावेळीही पेडणे तालुक्यातील हरमल मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राधिका पालेकर यांनी विजय मिळवलेला आहे.
भाजप व काँग्रेस ,मगो या पक्षांच्या उमेदवारांचा त्यांनी पराभव केला . थीवी मतदार संघ विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या कोलवाळ जिल्हा पंचायत निवडणुकांमध्येही 2020 मध्ये अपक्ष म्हणून जिंकलेल्या कविता कांदोळकर यावेळी ही अपक्ष म्हणून विजय मिळवलेला आहे . त्यांनी भाजपच्या उमेदवार सपना मापारी यांचा पराभव केला .
गोविंद गावडे यांना धक्का
माजी मंत्री आणि प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांना धक्का देत त्यांच्या मतदारसंघातील बेतकी खंडोळा जिल्हा पंचायतीमध्ये अपक्ष उमेदवार सुनील जन्मी भोमकर यांनी विजय मिळवला. भाजपाचे उमेदवार श्रमेश भोसले यांचा त्यांनी पराभव केलेला आहे आमदार गोविंद गावडे साठी हा धक्का मानला जात आहे .