Goa Politics | …म्हणून मंत्रिपदाचा त्याग केला: नीलेश काब्राल यांचा खुलासा

Goa Politics | …म्हणून मंत्रिपदाचा त्याग केला: नीलेश काब्राल यांचा खुलासा
Published on
Updated on

पणजी, पुढारी वृत्तसेवा : फुटीर आमदारांपैकी एखाद्याला मंत्रीपदाची संधी मिळावी, म्हणून आपण मंत्रिपदाचा त्याग केला आहे. आपल्याला डच्चू दिलेला नाही. आपण पक्षाचा निर्णय शीर्षस्थानी ठेवून स्वाभिमानाने राजीनामा दिला आहे, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी दिले आहे. Goa Politics

राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला होता. दरम्यान, मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एखाद्या महामंडळावर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काब्राल हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जातात. आज संध्याकाळी सात वाजता नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. या समारंभाला काब्राल उपस्थित राहणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यानंतरच पुढील हालचालींना वेग येणार आहे. Goa Politics

सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्यांच्या ३४५ पदांच्या कथित भरती घोटाळाप्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांना राजीनामा देण्याचे आदेश भाजप पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. त्यामुळे गोव्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

Goa Politics नीलेश काब्राल यांचा राजकीय प्रवास

२०१२ : कुडचडे मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक जिंकली. पक्षाने त्यांची पर्यटन विकास महामंडळाच्या (जीटीडीसी​) अध्यक्षपदी वर्णी लावली​ होती.

२०१७ : पुन्हा कुडचडेतून भाजपच्या उमेदवारीवर विजयी. पुन्हा 'जीटीडीसी'चे अध्यक्षपद देण्यात आले होते.

२४ सप्टेंबर २०१८ : मंत्रिपदाची शपथ घेतली. वीज, अक्षय ऊर्जा तसेच कायदा व न्याय या खात्यांच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

२०२२ : विधानसभेत पुन्हा भाजपच्या उमेदवारीवर विजय. सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, कायदा व न्याय या खात्यांचे मंत्री.
१९ नोव्हेंबर २०२३ : मंत्रिपदाचा राजीनामा.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news