Goa Weather Update | गोव्यामध्ये उष्म्याचा उच्चांक; म्हापसात तापमानाचा पारा 40 अंशावर तर मडगावात 37 अंश नोंदवले गेले

Goa Weather Update | म्हापसात ४०, तर मडगावात ३७ अंश तापमान
 weather update
weather updatepudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
अन्साभाट, म्हापसा येथील नोंदीनुसार दुपारी २.५८ वाजता म्हापसा येथील तापमान ४०.८ डिग्री सेल्सिअस एवढे, तर हवेतील आर्द्रता २७ टक्के इतकी नोंदवली गेली. हवामान अभ्यासक डॉ. नंदकुमार कामत यांनी ही माहिती प्रसारित केली असून, गोव्यातील इतिहासात एवढी प्रचंड गर्मी असलेला हा पहिलाच दिवस असावा, असे त्यांनी म्हटले आहे.

 weather update
Water Supply Crisis | मिरामार येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने पणजी शहरात तीव्र पाणीटंचाई; स्थानिकांचे प्रचंड हाल

मडगाव येथील केंद्रावर दुपारी २.३६ वाजता ३७.७ अंश सेल्सिअस एवढे तापमान आढळले, तर आर्द्रता ३७ टक्के होती. हवामान अभ्यासक अतुल नायक यांनी ही नोंद केली. डॉ. कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात म्हापसा येथील सर्वाधिक तापमान ३२ अंश सेल्सिअस एवढे असते, तर मडगाव येथील सर्वाधिक तापमान ३१ डिग्री सेल्सिअसच्या आसपास असते.

त्यामुळे आज जी तापमान नोंद झाली ती या राज्यातील हवामानाची सर्वाधिक नोंद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, गेल्या २४ तासांत फोंडा येथे फक्त २ मिमी पाऊस पडला. १ नोव्हेंबरपर्यंत हवामान खात्याने ग्रीन अलर्ट जारी केला असून, या काळात काही ठिकाणी तुरळक व मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली. कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news