Rat bites patient at Gomeco hospital |गोमेकॉमध्ये उंदराने कुरतडला रुग्णाचा पाय

उंदरांचा सुळसुळाट झाल्याने स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह
Rat bites patient at Gomeco hospital |गोमेकॉमध्ये उंदराने कुरतडला रुग्णाचा पाय
Published on
Updated on

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) बांबोळी येथे ऑपरेशनसाठी १११ वार्डमध्ये दाखल करण्यात आलेल्या नीलेश पोळजी नावाच्या रुग्णाचा पाय शुक्रवारी पहाटे तीन ३.३० च्या दरम्यान उंदराने कुरतडल्याची घटना घडली आहे. गोमेकॉत उंदरांचा सुळसुळाट झाल्याने स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नीलेश पोळजी यांच्या एका पायाला ऑपरेशन करायचे होते, म्हणून ते गोमेकॉमध्ये दाखल झाले होते. मध्यरात्रीनंतर केव्हा तरी ते गाढ झोपेत असताना उंदराने त्यांच्या पायाला दोन ठिकाणी चावे घेतले. त्यांना जेव्हा जाग आली तेव्हा उंदीर पळून गेला आणि संपूर्ण बेड रक्ताने माखला होता. त्यानंतर त्यांनी नर्सकडे तक्रार केली.

Rat bites patient at Gomeco hospital |गोमेकॉमध्ये उंदराने कुरतडला रुग्णाचा पाय
Goa Fire News | चार वाहनांना भीषण आग; 60 लाखांहून अधिक नुकसान

नर्सने तात्पुरते बँडेज बांधले. गोमेकॉमध्ये उंदरांचा सुळसुळाट झालेला असून, त्याचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचे पोळजी यांनी सांगितले.

Rat bites patient at Gomeco hospital |गोमेकॉमध्ये उंदराने कुरतडला रुग्णाचा पाय
Omkar Elephant Attack | गोव्यातून परतलेला ओंकार सीमाभागातच

जबाबदार कोण ?

नीलेश पोळजी म्हणाले, मला एका पायाला झालेल्या दुखापतीवर ऑपरेशन करून घेतले आणि आता उंदराने दुसऱ्या पायाला चावे घेतल्यामुळे आपले काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण? गोमेकॉ येथील उंदरांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी पोळजी यांनी केली आहे. गोव्याचे सर्वोत्कृष्ट इस्पितळात म्हणून नावाजलेल्या गोमेकॉमध्येच रुग्णाचा पाय उंदराने कुरतडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news