Pramod Sawant | राहुल गांधींच्या गोवा दौऱ्याचा आणि दहा मिनिटांच्या पदयात्रेचा भाजपवर काहीही परिणाम होणार नाही; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Pramod Sawant | राहुल गांधी यांनी मडगावात येऊन दहा मिनिटे पदयात्रा केल्याने गोव्याच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही.
CM Pramod Sawant
CM Pramod Sawantpudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राहुल गांधी यांनी मडगावात येऊन दहा मिनिटे पदयात्रा केल्याने गोव्याच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. गोमंतकीय सुज्ञ असून, भाजप सरकारने केलेला विकास त्यांना दिसत आहे.

CM Pramod Sawant
Nagali Hills Taleigao | नागाळी हिल्स-ताळगाव येथे शाब्दिक वादातून झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार संशयितांना पणजी पोलिसांकडून अटक

सरकारच्या विविध योजनांचा लाभही जनतेला मिळत आहे. काँग्रेसने गोव्यासाठी काय केले, हे त्यांनी जनतेला सांगावे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मडगाव येथे आयोजित काँग्रेसच्या गोवा राखण यात्रेत राहुल गांधी सहभागी झाल्याचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होईल का, असा प्रश्न पत्रकारांनी सोमवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना विचारला. त्यावर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, सत्तेत असताना काहीही काम न करता केवळ भ्रष्टाचार करणाऱ्या काँग्रेसचे नेते भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यांनी गोवा पाहिल्यास त्यांना सर्वत्र विकास दिसेल. राहुल गांधी यांनी दहा मिनिटांच्या पदयात्रेनंतर सभेत भाषण केले. यावेळी काँग्रेसने गोव्यासाठी केलेल्या कामांचा उल्लेख का केला नाही, असा सवालही त्यांनी केला.

CM Pramod Sawant
Floating Casinos Panajim | तरंगत्या कॅसिनोंमुळे पणजी शहरात वाढती वाहतूक कोंडी; उच्च न्यायालयाचे सरकारला तातडीने कारवाईचे निर्देश

कुणबी शालीचा अपमान म्हणजे गोव्याचा अपमान

राज्य सरकारने आदिवासी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी कुणबी शाल निर्मितीला प्राधान्य दिले आहे; मात्र राहुल गांधी यांनी गळ्यात घातलेली कुणबी शाल काढून पोडियमवर ठेवली. हा गोव्याचा अपमान आहे, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुणबी शाल घालण्यात आली होती, तेव्हा त्यांनी संपूर्ण कार्यक्रमात ती पारंपरिक शाल परिधान केली आणि नंतरही ती सोबत नेली. यावरून दोन्ही नेत्यामधील फरक दिसून येतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news