Goa News | केपे हादरले! कुस्मणमध्ये बंद घरात मायलेकीचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ

Goa News | कुस्मण-केपे येथील प्रकार; पोलिस तपास सुरू
death
death pudhari File Photo
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

केपे तालुक्यातील कुस्मण-केपे परिसरात बंद घरात आई व मुलगी मृतावस्थेत आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. अलका शिरवईकर (वय ७०) आणि त्यांची मुलगी अनार शिरवईकर (४२) अशी मृतांची नावे आहेत.

death
Nashik Crime News | आधी मैत्री, मग विवाहाचे आमिष आणि 'गजवा-ए-हिंद'च्या नावाखाली छळ; नाशिकमधील धक्कादायक प्रकार उघड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यांनी दोघींना २४ एप्रिल रोजी शेवटचे केपे बाजारात पाहिले होते. त्यानंतर तीन दिवस घराबाहेर त्यांची कोणतीही हालचाल दिसून आली नाही. शेजाऱ्यांनी ही बाब माजी नगरसेविका तेरेझा त्रावासो यांच्या निदर्शनास आणून दिली.

त्यांनी ही माहिती पोलिसांना दली. पोलिसांनी नगरसेवक अमोल काणेकर आणि नागरिकांसह खिडकीतून पाहणी केली असता अलका शिरवईकर या जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसून आल्या. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता अनार शिरवईकर यांचाही मृतदेह आढळून आला.

मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट

घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news