

Ashok Gajapathi Raju appointment Goa Governor
पणजी : पुसापती अशोक गजपती राजू यांची गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रपती भवनाने अधिकृत घोषणा केली असून, ते लवकरच राज्यपालपदाची शपथ घेणार आहेत.
पूर्वीचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या जागी अशोक गजपती राजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजू हे देशाचे माजी नागरी उड्डाण मंत्री तसेच आंध्र प्रदेशातील प्रतिष्ठित राज घराण्याचे सदस्य आहेत. प्रशासन आणि संसदीय कामकाजाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. गोवा हे वैविध्यपूर्ण संस्कृतीचे राज्य आहे. येथील जनतेची सेवा करण्याची संधी मिळणे ही सन्मानाची बाब आहे, अशी राजू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुसापती अशोक गजपती राजू यांचा जन्म आंध्र प्रदेशातील विजयनगरम् येथे झाला आहे. ते अनेक वेळा आमदार आणि खासदार राहिले आहेत. २०१४-२०१८ या कालावधीत त्यांनी केंद्रात नागरी उड्डाण मंत्री म्हणून काम पाहिले आहे. मृदू, सौम्य, अभ्यासू, प्रशासनात पारदर्शकता राखणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित आहेत. त्यांना पुसापती राजघराण्याचा वारसा मिळाला असून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ते सक्रीय आहेत.