Porvorim Flyover | पर्वरी उड्डाणपुलाच्या कामात सुरक्षेचा पत्ता नाही! वाहनचालकांच्या मृत्यूशी खेळ सुरू

Porvorim Flyover | पर्वरी येथे उड्डाणपुलाअंतर्गत कामे सुरू, पण पुरेशी सुरक्षितता नाही; अपघातांचा धोका कायम
Flyover
FlyoverPudhari
Published on
Updated on

सुकूर : भूषण आरोसकर

गिरी-सुकूर ते पर्वरीपर्यंत मुख्य राष्ट्रीय गोवा महामार्गावर उड्डाणपुलाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. उड्डाणपुलाखालून वाहने ये-जा करीत आहेत. ओ कोकेरो जंक्शनजवळ अरुंद रस्ता ठेवण्यात आला असून हा रस्ता अर्धा मातीचा असून त्यावर धूळ उडू नये यासाठी पाण्याचा फवारा मारला जातो.

Flyover
Shirgao Lairai Jatra 2026| स्टॉल्सच्या परवानगीसाठी कडक नियमावली जाहीर

सध्या याठिकाणी चिखल होत असून हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. कोणत्याही क्षणी येथे अपघात होऊ शकतात. पणजी ते म्हापसा दरम्यान नेहमीच मार्गावर वाहनचालकांची गर्दी असते.

गजबजलेला हा मार्ग असल्यामुळे या मार्गावर कोणत्याही प्रकारचे महामार्गाचे अथवा पुलाचे काम सुरू असल्यास उपाययोजना घेणे आवश्यक असते. मात्र, सध्या तसे होत नसल्याचे दिसून येत आहे.

मंत्री रोहन खंवटे यांनी ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण होण्याची मुदत सांगितली आहे, त्यामुळे घाईगडबडीत ही कामे होत आहेत की काय, अशी चर्चा आता वाहनचालकांतून केली जात आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे या मार्गावर पुलाखालून जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेटस् लावण्यात आले आहेत, तर दुसऱ्या बाजून गटाराचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.

ओ फोकेरो जंक्शनपासून म्हापशाच्या दिशेने बऱ्याच अंतरावर हीच स्थिती आहे. त्यामुळे म्हापशाहून पणजीच्या दिशेने जाताना अरुंद मागनि जावे लागते. त्यात एकाबाजूला बरिकेटस् तर दुसन्या बाजूने गटाराचे सुरू असलेले काम त्यामुळे वाहनांचा अपघात होण्याचा धोका वाढतो.

शिवाय रस्त्याचे डांबरीकरण अर्धवट स्थितीत असल्यामुळे मातीच्या रस्त्यावर पाणी ओतून झालेल्या चिखलामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या समस्या लक्षात घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करून हा मार्ग सुस्थितीत करावा, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

गटाराचे काम; बॅरिकेटस्च नाहीत

ओ कोकेरो जंक्शनवर गटाराचे काम सुरू आहे. मात्र, बऱ्याच ठिकाणी रस्त्याशेजारी अपघाताचा धोका टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारचे बॅरिकेटस् येथे लावण्यात आलेले नाहीत, अंदाज न आल्यास एखादा वाहनचालक थेट गटारासाठी खोदलेल्या खड्यात पडू शकतो. या कामाबाबत मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Flyover
Panaji Municipal Election Petition | पणजी महापालिका निवडणूक रद्द होणार? 'मतदानाची गुप्तता पाळली नाही' म्हणत उत्पल पर्रीकर न्यायालयात

मार्ग बंद; वाहनचालकांचे हाल

ओ कोकेरो जंक्शनपासून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गटाराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे ओ कोकेरो जंक्शनपासून बिठ्ठोण व पुंडलिक नगर याठिकाणी जाणारा वी. बी. बोरकर मार्ग बंद आहे. परिणामी लोकांना सध्याच्या धोकादायक मार्गावरून जावे लागत आहे. हे काम गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्यांना होली फॅमिली चर्चपासून समोरून जाणाऱ्या रस्त्याचा वापर करण्याची नामुष्की ओढवत आहे.

यापूर्वी अनेक अपघात

उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यापासून या परिसरात बरेच अपघात झाले आहेत. काही जण जखमी तर काही जणांचे जीवही गेले आहेत. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता अपघात होऊ नये यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news