Shirgao Lairai Jatra 2026| स्टॉल्सच्या परवानगीसाठी कडक नियमावली जाहीर

Shirgao Lairai Jatra 2026| शिरगाव लईराई जत्रोत्सवासाठी विशेष समितीची नियुक्ती
Goa Lairai Devi Yatra stampede
Goa Lairai Devi Yatra stampede file photo
Published on
Updated on

डिचोली : पुढारी वृत्तसेवा

शिरगाव येथील श्री देवी लईराईचा जत्रोत्सव २१ एप्रिल रोजी साजरा होत आहे. या उत्सवाचे महत्त्व आणि तिथे होणारी भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेता, उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने कडक पावले उचलली आहेत. गेल्या वर्षी जत्रोत्सवादरम्यान झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेतून धडा घेत, यंदा प्रशासनाने चोख गर्दी व्यवस्थापन आणि स्टॉल्सच्या नियोजनासाठी डिचोली उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय विशेष समितीची नियुक्ती केली आहे.

Goa Lairai Devi Yatra stampede
Panaji Municipal Election Petition | पणजी महापालिका निवडणूक रद्द होणार? 'मतदानाची गुप्तता पाळली नाही' म्हणत उत्पल पर्रीकर न्यायालयात

उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परब यांनी या संदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत. शिरगावची जत्रा ही केवळ गोव्यातच नव्हे, तर शेजारील राज्यांतील हजारो धोंड आणि भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भाविकांची सुरक्षा धोक्यात येऊ नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानेही विशेष दखल घेतली होती.

न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि त्यानंतर नियुक्त केलेल्या तथ्य शोध समितीच्या शिफारशींच्या आधारे यंदाच्या जत्रेसाठी विशेष इव्हेंट मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करणे सर्व संबंधित विभाग आणि भागधारकांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.

प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार, जत्रेच्या मुख्य परिसरात होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी विक्रेते आणि स्टॉल्सवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. रस्त्याच्या मुख्य वहिवाटीच्या ठिकाणी किंवा अरुंद गल्ल्यांमध्ये कोणतेही स्टॉल्स लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. बॉटलनेक म्हणजेच गर्दीची कोंडी टाळण्यासाठी मुख्य रस्ते पूर्णपणे मोकळे ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय पंचायतीला कोणत्याही विक्रेत्याला ना-हरकत दाखला देता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.

Goa Lairai Devi Yatra stampede
Curchorem Sex Scandal Goa | सोहम नाईक तिसऱ्या प्रकरणात क्राईम ब्रँचच्या ताब्यात! तपासाचा वेग वाढला

जत्रेतील स्टॉल्सची संख्या निश्चित करण्यासाठी आणि त्यांच्या मांडणीला (लेआउट) तांत्रिक मंजुरी देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्षपद डिचोलीचे उपजिल्हाधिकारी भूषवणार आहेत. या समितीत डिचोलीचे उपअधीक्षक, अग्निशमन दलाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, वीज विभागाचे कार्यकारी अभियंता, देवी लईराई संस्थानचे प्रतिनिधी, शिरगाव पंचायतीचे सचिव आणि डिचोलीचे मामलेदार यांचा समावेश आहे.

अतिक्रमणे हटविण्याची मोठी जबाबदारी

या समितीवर स्टॉल्सच्या मांडणीसह तिथे होणारी विजेची व्यवस्था, अग्निशमन सुरक्षा आणि अनधिकृत अतिक्रमणे हटवण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते रुंद ठेवणे आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बाहेर पडण्याचे मार्ग सुलभ ठेवणे, याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जत्रोत्सवाचा आनंद सुरक्षित वातावरणात घेता यावा, यासाठी प्रशासन आणि देवस्थान समिती आता युद्धपातळीवर कामाला लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news