Ponda Goa Politics | फोंडा काबीज करण्यासाठी राजकीय रणनिती सुरू; विविध राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग

Ponda Goa Politics | फोंडा विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली असून, भाजपसमोर कडवे आव्हान उभे ठाकले आहे.
goa assembly winter session
goa assembly winter session Pudhari
Published on: 
Updated on: 

फोंडा (पुढारी वृत्तसेवा):

विधानसभा निवडणूक जवळ येत चालली आहे, तसे राजकीय पक्ष सक्रिय होत चालले आहेत. फोंडा मतदारसंघात गेले वर्षभर आमदारच नसल्याने आता हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून चाली खेळल्या जात आहेत. कधी नव्हे तो फोंडा मतदारसंघ हा भाजपमय करण्यासाठी दिवंगत आमदार रवी नाईक यांनी प्रयत्न केले आणि फोंड्यावर भाजपची मोहोर उठवली.

goa assembly winter session
Goa Ponda market project trader relocation | फोंडा पालिका बाजार प्रकल्पासाठी व्यापाऱ्यांचे स्थलांतर

आताही फोंडा मतदारसंघावर आपले वर्चस्व राखण्यासाठी भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राज्यात भाजपवर मतदारांचा रोष असल्याने काँग्रेससह मगो, आप आणि गोवा फॉरवर्ड यांच्यासह आरजीही रिंगणात उतरल्याने भाजप फोंडा राखून शकते का ते पाहावे लागेल.

मगो - भाजप युती न झाल्यास भाजपाला हा मतदारसंघ आपल्याकडे राखून ठेवण्यात अनंत अडचणी येण्याची शक्यता आहे. फोंडा मतदारसंघात एकूण ३१ हजार मतदार आहेत, त्यात १० हजारपेक्षा जास्त मते मिळवणारा उमेदवार या मतदारसंघात बाजी मारू शकतो.

त्यामुळे मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी राजकीय पक्षांचा आटापिटा सुरू आहे. शेवटी मतदार राजाच्या हाती कौल असल्याने नेमका कोणता पक्ष बाजी मारतो ते पाहावे लागेल. मगो - भाजप युतीवर सारे काही अवलंबून असून, राज्यात मगो - भाजप युतीवर या दोन्ही पक्षांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे.

या वेळेला मगो पक्षाने फोंड्यावर दावा केला आहे. मागील सहा निवडणुका मगो मतदारसंघात सातत्याने निवडून येणारे मगो नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी फोंड्यातून नशीब आजमावण्याचे ठरवले होते. २०१२ च्या निवडणुकीत मगोचे उमेदवार लवू मामलेदार हे फोंड्यातून निवडून आले होते.

मात्र त्यानंतर २०१७ मध्ये काँग्रेस तिकिटावर तर २०२२ मध्ये भाजप तिकिटावर रवी नाईक हे या मतदारसंघातून निवडून येऊन आपले वर्चस्व सिद्ध केले होते. त्यावेळी रवी नाईक यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनी कडवे आव्हान उभे केले होते.

गेल्या निवडणुकीत केवळ ७० मतांनी केतन भाटीकर यांचा विजय हुकला होता. मात्र काँग्रेसमधून भाजपात जाऊन निवडणूक जिंकणारे रवी नाईक यांच्यामुळे फोंड्यात कधी नव्हे तो विजय प्राप्त झाला होता.

goa assembly winter session
Goa BJP Damu Naik | मगोशी युती अन् फोंडा जागेचा पेच! निर्णय वरिष्ठच घेणार; भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे विधान

संभाव्य उमेदवार कोण?

सध्यास्थितीत भाजपकर्फे रितेश रवी नाईक व विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवी, मगोतर्फे सुदिन ढवळीकर, काँग्रेसतर्फे राजेश वेरेकर, आम आदमी पक्षातर्फे गितेश नाईक अशी संभाव्य दारांची नावे आहेत. मात्र युती झाल्यास नेमकी कुणाला उमेदवारी मिळेल हे त्यावेळीच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, भाटीकर यांच्या निधनारमळे इतर राजकीय समोरील आव्हान काही अंश कमी झाले आहे. त्यामुळे मगोचा डोळा फोंड्यावर आहे.

मतदारांची चांदी...

फोंडा मतदारसंघात मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी सध्या भाजप - मगो - काँग्रेस या राजकीय पक्षांच्या संभाव्य उमेवारांकडून भगिरथ प्रयत्न सुरू आहेत. फोंड्यात मोफत आरोग्य शिबिरांचा रtब घालण्यात येत आहे. याशिवाय क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम पुरस्कृत करण्याची चढाओढ लागली आहे. चतुर्थी, दिवाळीला कडधान्य तसेच भेटवस्तू देऊन झाल्या आहेत. एकेंदर मतदारांची फोंड्यात चांदी झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.