Pedne municipal financial irregularities : पेडणे पालिकेत आर्थिक गोंधळ

पगार, पेन्शन थकीत; ६३ लाखांचा सिवरेज टँकरही धुळीत
Pedne municipal financial irregularities
पेडणे पालिकेत आर्थिक गोंधळpudhari photo
Published on
Updated on

पेडणे : पेडणे नगरपालिकेतील कारभार सध्या गंभीर प्रश्नचिन्हाखाली आला असून कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन आणि नागरिकांची कामे महिनोनमहिने रखडल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या सलग तीन महिन्यांचा पगार कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही, तर काही निवृत्त कर्मचाऱ्यांना दोन वर्षांपासून पेन्शन मिळालेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यात भर म्हणजे सुमारे ६३ लाख रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेला सिवरेज टँकर गेल्या सात महिन्यांपासून वापराविना पडून आहे. गाडी खरेदी करताना चालक, संबंधित कामगार आणि अंतर्गत रस्त्यांची क्षमता यांचा कोणताही विचार करण्यात आला का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

Pedne municipal financial irregularities
Goa gas tanker accident : बार्शे - पाडी येथे गॅसवाहू टँकरचा अपघात

संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केल्यास कधी चालक उपलब्ध नसल्याचे, तर कधी सिवरेज प्लांट बंद असल्याचे सांगितले जाते. मात्र, हा प्लांट फक्त पेडण्यासाठीच बंद आहे की संपूर्ण गोव्यासाठी, हा प्रश्नही अनुत्तरितच आहे. तसेच पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार असल्याने ते पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित नसतात. परिणामी नागरिकांच्या तक्रारी आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेला विलंब होत असल्याची तक्रार आहे.

प्रशासकीय कामे पूर्णपणे ठप्प

पालिकेकडे दोन अभियंते आणि दोन लेखापाल कार्यरत असताना एकही कारकून नसल्यामुळे दैनंदिन प्रशासकीय कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. घरपट्टी ट्रान्स्फरच्या फाईल्स महिनोनमहिने प्रलंबित पडून असून नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कामगार असलेल्या पालिकेत त्यांनाही गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे.

Pedne municipal financial irregularities
Benefits of cardamom : छोट्या वेलचीचे काय आहेत मोठे फायदे ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news