Goa gas tanker accident : बार्शे - पाडी येथे गॅसवाहू टँकरचा अपघात

अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव मडगाव ते काणकोण हमरस्त्यावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काणकोण आगोंद-बेतुल मार्गे वळविण्यात आली.
Goa gas tanker accident
मडगाव : गॅसवाहू टँकरवर पाणी मारताना अग्निशमन दलाचे जवान.pudhari photo
Published on
Updated on

मडगाव : मडगाव-कारवार महामार्ग एनएच-६६ वर वार्श-पाडी दरम्यान गॅसवाहू टँकरचा अपघात झाला. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव मडगाव ते काणकोण हमरस्त्यावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काणकोण आगोंद-बेतुल मार्गे वळविण्यात आली होती.

अपघाताची माहिती मिळताच राज्य सरकारची आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मामलेदार, उपजिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकारी, यंत्रणा घटनास्थळी पोहोचले आहेत.

Goa gas tanker accident
Holi accident death : होळी अंगावर कोसळून पोलिस हवालदाराचा मृत्यू

या ठिकाणी पोलिसही तैनात करण्यात आले होते. कुंडईहून एलपीजी कंपनीची यंत्रणाही अपघातस्थळी दाखल झाली आहे. अपघातानंतर मडगाव-काणकोण महामार्गावरील अवजड वाहने तात्पुरती थांबवण्यात आली आहेत.

Goa gas tanker accident
Goa drug trafficking case : ड्रग्ज माफिया डुड्डूविरुद्ध आरोप निश्चित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news