MLA Jit Arolkar | आमदार जीत आरोलकरांमुळे चार वर्षांच्या मुलाला जीवदान

MLA Jit Arolkar | आपल्या मतदारसंघात आर्थिक विवंचनेतून कोणी आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, असा ध्यास आमदार जीत आरोलकर यांनी घेतला आहे.
mla jeet arolkar-demands marathi as official language in assembly
आमदार जीत आरोलकर Pudhari File Photo
Published on
Updated on

पेडणे : आपल्या मतदारसंघात आर्थिक विवंचनेतून कोणी आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, असा ध्यास आमदार जीत आरोलकर यांनी घेतला आहे. कासारवर्णेतील उमेश वरक यांच्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला धावून गेल्यानंतर आता पार्से येथील चार वर्षांच्या मुलाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेत आरोलकर यांनी पुन्हा एकदा नवा आदर्श निर्माण केला आहे.

mla jeet arolkar-demands marathi as official language in assembly
Goa Night Club Fire Case | लुथरा बंधूंसह 13 जणांविरुद्ध 4150 पानी आरोपपत्र दाखल

आमदार आरोलकर यांच्या दातृत्वामुळे या मुलाला जीवदान मिळाले आहे. पार्से चावरेवाडा येथील आरव नागवेकर या चार मुलाचे हृदय उजवीकडे होते. त्यामुळे मुलाची वाढ होत नव्हती. त्याच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

मात्र, ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याची सुविधा गोव्यात उपलब्ध नव्हती. त्यामुळे नागवेकर कुटुंबीयांनी त्याला बेळगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले होते. यावेळी या मुलावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.

mla jeet arolkar-demands marathi as official language in assembly
Goa Smart Meters | स्मार्ट मीटर्स बसवण्यास संमती आवश्यक

मात्र, त्यासाठी मोठा खर्चही सांगितला होता. त्यामुळे नागवेकर कुटुंबीय हतबल झाले होते. माहिती मिळताच आरोलकर यांनी नागवेकर कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन दिले. त्यानुसार आरव याच्यावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे आमदार जीत आरोलकर यांच्या दातृत्वाचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे.

डॉक्टरांचे आभार : जीत आरोलकर आरव याच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तो आता शुद्धीतही आला आहे. शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे आभार मानतो. लवकरच आरवला भेटण्यासाठी बेळगावला जाणार असल्याचे आरोलकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news