MLA Jeet Arolkar | दर्जेदार काम करून ते वेळेत पूर्ण करा

MLA Jeet Arolkar | आमदार आरोलकर : आरोबा येथील वॉकिंग प्रोमेनेड, इतर कामांबाबत सूचना
mla jeet arolkar-demands marathi as official language in assembly
आमदार जीत आरोलकर Pudhari File Photo
Published on
Updated on

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

धारगळ-आरोबा रस्त्यालगत सुरू असलेल्या वॉकिंग प्रोमेनेड आणि सुशोभीकरण प्रकल्पाच्या कामांची आमदार जीत आरोलकर यांनी संबंधित - अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला असून, कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये तसेच प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

mla jeet arolkar-demands marathi as official language in assembly
Sindhudurg Tourism 2026 | गुलदार नौकेचे दहा तासांचे 'ऑपरेशन निवती'

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांना फिरण्यासाठी, व्यायामासाठी आणि विरंगुळ्यासाठी आकर्षक व आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, यावेळी सार्वजनिक पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणे आणि तसेच नागरिकांसाठी उत्तम सार्वजनिक जागा निर्माण करणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचे सांगण्यात आले.

स्वतंत्र वॉकिंग ट्रॅक, विश्रांतीसाठी जागा

या प्रकल्पाअंतर्गत नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि निसर्गरम्य वातावरणात चालण्यासाठी स्वतंत्र वॉकिंग ट्रॅक, विश्रांतीसाठी जागा तसेच सुशोभित परिसर विकसित करण्यात येत आहे. आरोग्यदायी व सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

प्रकल्प ठरणार आकर्षणाचे केंद्रबिंदू

धारगळ-आरोबा परिसरातील हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांसह पर्यटकांसाठीही तो आकर्षणाचे केंद्र ठरणार असून, परिसराच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच नागरिकांच्या जीवनमानातही सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news