Goa Patradevi Checkpost Liquor Seizure|पत्रादेवी तपासणी नाक्यावर ३२.४० लाखांचा मद्यसाठा जप्त

Goa Patradevi Checkpost Liquor Seizure| पत्रादेवी तपासणी नाक्यावर ३२.४० लाखांचा मद्यसाठा जप्त
Goa Patradevi Checkpost Liquor Seizure
३२.४० लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला
Published on: 
Updated on: 

पणजी : गोवा अबकारी खात्याने मध्यरात्रीच्या सुमारास पत्रादेवी तपासणी नाक्यावर मोठी कारवाई करत ३२.४० लाख रुपये किंमतीचा तस्करी करण्यात येणारा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईत मद्य वाहतुकीसाठी वापरला जाणारा २५ लाख रुपये किमतीचा ट्रकही ताब्यात घेण्यात आला आहे. जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ५७.४० लाख रुपये इतकी आहे. ट्रक चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

अबकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री पत्रादेवी तपासणी नाक्यावर गोव्याबाहेर जाणाऱ्या माल वाहतूक अवजड वाहनांची तपासणी करण्यात येत होती. ही तपासणी सुरू असताना एका ट्रकामध्ये लाकडी भुशाच्या गोण्या प्रथमदर्शनी दिसत होत्या. अधिकाऱ्यांना संशय आल्याने या ट्रकची कसून तपासणी केली असता या गोण्यांखाली सुमारे 'गोवा व्हिस्की' ब्रँडचे तब्बल ५०० बॉक्स आढळून आले.

Goa Patradevi Checkpost Liquor Seizure
Goa Manoj Parab vs Viresh Borkar RGP Rift |'वीरेश बोरकर यांना घडवले, राजकीय अंतही मीच करणार'

अबकारी विभागाने केलेल्या या कारवाईनंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. राजस्थान नोंदणीकृत ट्रकातून अवैध मद्यसाठाच्या वाहतुकीमागे कोणाचा हात आहे आणि हा साठा कोठे नेला जात होता, याचा पुढील तपास गोवा अबकारी विभागाचे अधिकारी करत आहेत.

Goa Patradevi Checkpost Liquor Seizure
Goa Shirgaon Mining Economic Environmental Loss|खाणकामामुळे शिरगावला अर्थकारणाचा फटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.