

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मनोज परब 'आरजीपीचा आमदार म्हणून वरिश बोरकर यांना मीच घडवले. ज्यांना आमदार म्हणून घडवले, त्यांचा राजकीय अंतही मीच करणार, वीरेश यांना राजकीयदृष्ट्वा संपवणे हा आता माझा वैयक्तिक अजेंडा असेल,' असा थेट इशारा आरजीपीमध्ये प्राथमिक सदस्य म्हणून पुन्हा प्रवेश केलेले पक्षाचे माजी अध्यक्ष मनोज परब यांनी दिला. एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.
रिव्होल्युशनरी पक्ष लोकशाही पद्धतीने चालवणे, सर्वांशी भोकळेपणाने चर्चा करणे आणि प्रत्येकाला आपले मत मांडण्याची संधी देणे, हीच आपली मोठी चूक ठरली. पक्ष हुकूमशाही पद्धतीने चालवला असता, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, अशी खंतही परब यांनी व्यक्त केली.
आझाद मैदानावर उपोषण करण्याचा सल्ला आपणच आमदार वीरेश बोरकर यांना दिला होता, असा दावा परब यांनी केला. याबाबत बोरकर यांनी नारळावर हात ठेवून गोमंतकीयांसमोर सत्य सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले. 'ही चळवळ तू जाहीर केली आहेस, तर ती आणखी मोठी करूया,' असे सांगून आपणच आझाद मैदानावरील आंदोलनाची घोषणा केली होती, असे परब म्हणाले.
बोरकर यांच्याबद्दल आपल्याला असूया असती, तर त्यांचे नुकसान करण्याची संधी आपल्याकडे होती. त्यांना आझाद मैदानावर नेऊन हिरो बनवण्याची गरजच नव्हती. ते आपल्या पक्षाचे आमदार होते. आपला आमदार मोठा झाला, तर पक्षही मोठा होईल, हाच आपला प्रामाणिक हेतू होता, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाची मान्यता आणि पक्षाचे सर्व अधिकृत व्यवहार आपल्या गटाशी संबंधित असल्याने आपलाच पक्ष अधिकृत असल्याचा दावा परब यांनी केला. आमदार वीरेश बोरकर यांना पक्षातून यापूर्वीच काढून टाकण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. आझाद मैदान आणि टीसीपी कार्यालयासमोरील फुटपाथ आंदोलनाचे नियोजनही आपणच केले होते. आंदोलन सुरू असताना, 'तुम्ही वीरेशला मारायला निघाला आहात, त्याला आंदोलन मागे घ्यायला सांगा, असा दबाव बोरकर यांच्या कुटुंबीयांकडून आणला जात होता, असा आरोप परब यांनी केला.
या आंदोलनामुळेच गोव्याला आणि वीरेश बोरकर यांना आमदारकीची ताकद काय असते, याची जाणीव झाली. त्यामुळे वरिश यांना घडवले आणि आता त्यांनाच राजकीयदृष्ट्या संपवणार, हे आपण अभिमानाने आणि आव्हान देऊन सांगत असल्याचे परब म्हणाले. पूर्वी आम्ही इतर आमदारांवर टीका आणि आरोप करायचो. आज वरिश बोरकरही त्याच पद्धतीने वागत आहेत. आम्ही घडवलेल्या नरकासुराचा वध आता आम्हालाच करावा लागेल. भविष्यात दुसरा आमदार निवडून आल्यास त्याने पक्षविरोधी पाऊल उचलण्यापूर्वी त्याच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे, असे परब म्हणाले.
पक्षात पारदर्शकता ठेवणे, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे आणि लोकशाही पद्धतीने पक्षाचा विस्तार करणे, यामुळेच आपण स्वतःचे नुकसान करून घेतले. हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवला असता, तर संबंधितांना केव्हाच पक्षाबाहेर काढले असते, अशी टिप्पणीही त्यांनी केली. पक्षात फूट पाडण्यासाठी काँग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष जबाबदार असल्याचा आरोप परब यांनी केला. आपले राजकीय अस्तित्व संपेल.
चॅप्टर ३ मध्ये आणखी गौप्यस्फोट, आमदार वीरश बोरकर यांचा मनोज परबांना थेट इशारा
पणजी: पुढारी वृत्तसेवा
सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी आरजीपीचे नेते मनोज परब यांच्या आरोपांना जोरदार वरिश बोरकर प्रत्युत्तर देताना आगामी व्हिडिओ मालिकेच्या 'चॅप्टर ३'मध्ये आणखी महत्त्वाचे गौप्यस्फोट केले जातील, असा इशारा दिला आहे.
आरजीपीची स्थापना आपण केली आणि वरिश बोरकर यांना आमदार बनवले, असा दावा मनोज परब यांनी केला होता. या दाव्यावर प्रतिक्रिया देताना बोरकर यांनी आरजीपी हा कोणत्याही एका व्यक्तीचा पक्ष नसून, या चळवळीत योगदान व आर्थिक मदत देणाऱ्या प्रत्येक गोमंतकीयाचा आहे, असे स्पष्ट केले.
परब यांच्या अलीकडील वक्तव्यांमागे नेमका कोणाचा राजकीय अजेंडा आहे, असा सवालही बोरकर यांनी उपस्थित केला. त्यांच्या राजकीय भूमिकेमागे काही विशिष्ट हितसंबंध किंवा राजकीय शक्त्ती कार्यरत आहेत का, याचा विचार जनतेने करावा, असे संकेत त्यांनी दिले
शब्दप्रयोग आणि भाषेवरही आक्षेप...
परब यांच्या भाषणातील शब्दप्रयोग आणि भाषेवरही बोरकर यांनी नाराजी व्यक्त केली. राजकीय मतभेद असले तरी गोवा आणि गोमंतकीयांच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले, 'गोवा आणि गोमंतकीयांचे रक्षण करणे हेच माझे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे,' असे बोरकर यांनी स्पष्ट केले.