Parye-Gholwada Road Condition | पर्ये-घोलवाडा मार्ग बनला मृत्यूचा सापळा! खोदकामावर केवळ मातीची 'मलमपट्टी'

Parye-Gholwada Road Condition | दुचाकीस्वार घसरून अपघातांच्या संख्येत वाढ; पर्ये-साखळी मार्गावर चालणेही कठीण
goa news
goa news
Published on
Updated on

केरी : पुढारी वृत्तसेवा

पर्ये-घोलवाडा (सत्तरी) येथे पर्ये -साखळी मार्गावरील व्हाईट हाऊस रेस्टॉरंट ते जीआयएम गेट या दरम्यानच्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून वाहनचालक व स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

goa news
Panjim Municipal Election 2026 | अर्ज माघारी प्रक्रियेनंतरच अंतिम यादी स्पष्ट

पाण्याचे पाइप टाकण्यासाठी रस्त्याचे खोल खोदकाम करून ते माती व दगडांनी बुजवण्यात आले; मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत व्यवस्थित डांबरीकरण करण्यात आलेले नाही. सदर मार्ग अरुंद असून चढाव व धोकादायक वळण असल्याने समोरून येणारी वाहने वेळेवर दिसत नाहीत.

खोदकाम केलेल्या ठिकाणी माती साचल्यामुळे वाहने घसरतात, तर टाकलेले दगड पुन्हा रस्त्यावर येत असल्याने दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग विशेषतः धोकादायक बनला आहे. काही वाहनचालक घसरल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

साखळी भागात जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने अनेक स्थानिक तसेच परराज्यातील वाहने जीपीएसच्या मार्गदर्शनाने याच रस्त्याने ये-जा करतात. रस्त्यावर बाजूला घेण्यास जागा नसल्याने दोन वाहनांची क्रॉसिंग करताना अडचण निर्माण होते.

भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून खोदकाम झालेल्या रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण करावे, धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

goa news
Goa Government AI Chatbot | गोव्याचा 'डिजिटल' झेप! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 24 तास सेवा देणाऱ्या 'एआय' चॅटबॉटचे उ‌द्घाटन

धोकादायक स्थिती

धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून समोरून वाहन गेल्यास मागील वाहनचालकांना धूळ सहन करावी लागते. पदचाऱ्यांनाही मोठा त्रास होत आहे. समोरून चारचाकी वाहन आल्यास दुचाकी वाहनाला जायला वाट मिळत नाही.

सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना व वयोवृद्धांना सुरक्षितपणे चालणे कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news