Goa Government AI Chatbot | गोव्याचा 'डिजिटल' झेप! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 24 तास सेवा देणाऱ्या 'एआय' चॅटबॉटचे उ‌द्घाटन

Goa Government AI Chatbot | नागरिकांना मिळणार चोवीस तास डिजिटल सेवा
Goa News
Goa News
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा सरकारने नागरिकांना सरकारी सेवांचा सुलभ व जलद लाभमिळावा यासाठी गोवा ऑनलाइन पोर्टलवर एआय-आधारित चॅटबॉट (बीटा आवृत्ती) सुरू केला आहे. हा चॅटबॉट एकच डिजिटल सहायक म्हणून २४ तास सेवा देणार आहे.

Goa News
Black Panther And Tiger | गोवा ते आंबोली 'वाईल्ड लाईफ कॉरिडॉर' जपण्याची गरज; एकाच दिवशी वाघ, ब्लॅक पँथर साथ साथ

त्याचे उ‌द्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन विभाग (डीआयटीईसी) यांनी गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (गेल) यांच्या सहकार्याने हा चॅटबॉट विकसित केला आहे.

या चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिक विविध सरकारी सेवांसाठी अर्ज करू शकतात, अर्जाची स्थिती तपासू शकतात, प्रमाणपत्रे व पावत्या डाऊनलोड करू शकतात तसेच अभिप्रायही देऊ शकतात अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

Goa News
Panjim Municipal Election 2026 | अर्ज माघारी प्रक्रियेनंतरच अंतिम यादी स्पष्ट

यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले की, गोवा सरकारकडून 'एआय' आधारित डिजिटल सहाय्यकाची सुरुवात केली असून या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी अर्ज करणे, अर्जाची स्थिती तपासणे तसेच अधिकृत कागदपत्रे डाउनलोड करणे आता एकाच चॅट विंडोमधून २४ तास शक्य होणार आहे. हे एआय चॅटबॉट मुळे विविध विभागांना एकत्र जोडणारे एकसंध डिजिटल व्यासपीठ म्हणून काम करणार आहे, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news