Madgaon Gandhi Market | गांधी मार्केटमधील जुन्या इमारतीचा भाग कोसळला

Madgaon Gandhi Market | गांधी मार्केटमधील जुन्या मीट शॉप इमारतीचा कोसळलेला भाग.
Madgaon Gandhi Market
Madgaon Gandhi Market
Published on: 
Updated on: 

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील ऐतिहासिक व गजबजलेल्या गांधी मार्केट परिसरात जुन्या मीट शॉप इमारतीचा काही भाग रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने दुर्घटनेच्या वेळी परिसरात विक्रेते किंवा ग्राहक उपस्थित नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Madgaon Gandhi Market
Sal River Pollution | सासष्टीची जीवनदायिनी धोक्यात! मडगाव-फातोर्डाच्या सांडपाण्याने साळ नदी प्रदूषणाच्या विळख्यात

मिळालेल्या माहितीनुसार, गांधी मार्केटमधील स्वच्छतागृहाजवळ असलेल्या जुन्या मीट शॉप इमारतीचा एक भाग रविवारी पहाटे सुमारे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास कोसळला. पहाटे बाजारपेठेत आलेल्या काही विक्रेत्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने स्थानिक प्रतिनिधी राजेंद्र आजगावकर यांना घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच आजगावकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि याबाबत मडगाव नगरपालिका प्रशासनाला माहिती दिली. दरम्यान, पहाटे इमारतीचा एक भाग कोसळल्यानंतर सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्याच बांधकामाच्या दुसऱ्या बाजूचा मोठा भागही खाली कोसळला. मात्र, इमारत धोकादायक स्थितीत असल्याचे लक्षात आल्याने पालिका व स्थानिक प्रशासनाने विक्रेत्यांना त्या भागात बसण्यास आधीच मनाई केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news