Goa Vegetable | फळभाज्यांचे दर स्थिर, पण आले-लसूण अजूनही कडू; गृहिणींचे बजेट कोलमडले

Goa Vegetable | बाजारपेठेत आले, लसूणचा दर वाढलेलाच
vegetable price fluctuation
VegetablePudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजी बाजारात या रविवारी भाज्यांचे दर स्थिर होते. बटाटा ४० रुपये किलो असून कांदा, टोमॅटोचा दर ३० रुपये किलो होता. तो आता ३५-४० रुपये झाला आहे. फलोत्पादन महामंडळाच्या स्टॉलवर कांदा, बटाटा, टोमॅटो अनुक्रमे २३, २४, २७ असा दर आहे. या रविवारी थोडी किंमत कमी झाली.

vegetable price fluctuation
Goa Patient Death | रस्त्याअभावी मृत्यूचा सापळा! सत्तरीत 58 वर्षीय महिलेचा रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचेपूर्वीच अंत

कांद्याचा दर मात्र बाजारात याही रविवारी ४० रु. आहे. आले व लसूणचा दर मात्र दोन्ही ठिकाणी वाढलेलाच दिसला. बाजारात लसूण २५० ते ३२० रु. किलो, तर फलोत्पादनकडे २२५ रु.दर आहे. आल्याचा दर बाजारात १६० तर फलोत्पादनकडे १०० रुपये आहे. सध्या बाजारात गावठी भाजी मोठ्या प्रमाणावर येत आहे.

vegetable price fluctuation
Panaji Fish Market | रविवारी मासळी बाजारात शुकशुकाट! शाकाहारी जेवणामुळे माशांच्या विक्रीत मोठी घट

त्यात वाली, चवळीचा पाला, मुळा व लाल भाजी, शेवग्याच्या शेंगा यांचा समावेश अधिक आहे. यामुळे व्यापारी बाजारपेठेतील भाज्यांपेक्षा या भाज्यांना लोक अधिक पसंती देत आहेत. अनेक स्थानिक शेतकरी या भाज्या आपल्या शेतात पिकवत आहेत. चवळीचा पाला ५० रुपये वाटा, वाली ५० ला २ ते ३ पेंड्या, मुळा, लाल भाजीच्या १५ ते २० रुपयांना पेंडी मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news