Goa Patient Death | रस्त्याअभावी मृत्यूचा सापळा! सत्तरीत 58 वर्षीय महिलेचा रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचेपूर्वीच अंत

Goa Patient Death | दोन कि.मी.ची स्ट्रेचरवरून पायपीट करूनही प्रयत्न व्यर्थ
Yavatmal drown incident
रेल्वे पुलाचा खड्डा ठरला मृत्यूचा सापळा; चार मुलांचा दुर्दैवी अंत
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सत्तरी तालुक्यातील ओवलयेन-पिसुर्ले या गावातील ५८ वर्षीय बेशुद्ध महिला रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी १०८ रुग्णवाहिका तसेच स्थानिकांनी रस्त्याअभावी तिला स्ट्रेचरवरून सुमारे २ किलोमीटर अंतर पायपीट करत रुग्णवाहिकेपर्यंत नेले.

Yavatmal drown incident
Ponda By-election | फोंडा पोटनिवडणुकीचा फैसला आज! उच्च न्यायालयाच्या निवाड्याकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष

मात्र, दुर्दैवाने तिचे निधन झाले. हे अंतर चालत जाण्यासाठी लागलेल्या वेळामुळे तिला तत्काळ उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे या महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या आजारी महिलेला इस्पितळात नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिलेला फोन करण्यात आला. रुग्णवाहिका आली; मात्र रुग्णाच्या घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसून पायवाट असल्याने रुग्णवाहिका जाऊ शकली नाही.

Yavatmal drown incident
Ponda By-election | फोंडा पोटनिवडणुकीचा फैसला आज! उच्च न्यायालयाच्या निवाड्याकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष

रग्णवाहिकेच्या ईएमटी आश्विनी शेटकर व पायलट (चालक) अजित नरोजी हे चालत त्या महिलेच्या घरापर्यंत स्ट्रेचर घेऊन गेले. हे अंतर सुमारे दोन किलोमीटर एवढे होते. ते या महिलेच्या घरी पोहोचले.

कोणताही वेळ न लावता व प्राथमिक उपचार करून या रुग्ण महिला स्ट्रेचरवर घालून पायवाटेने निघाले. या रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी केली. त्यांना ग्रामस्थांनीही साथ दिली. रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंग पाहून केलेल्या कामगिरीचा आरोग्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news