Panjim Smart City | पणजीतील स्मार्ट बस स्टॉप प्रवाशांसाठी त्रासदायक

Panjim Smart City | पणजी शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत बांधण्यात आलेले बस स्टॉप प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहेत.
High Court delivers strong words on panjim Smart City
High Court delivers strong words on panjim Smart CityFile Photo
Published on
Updated on

पर्वरी: पुढारी वृत्तसेवा

पणजी शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत बांधण्यात आलेले बस स्टॉप प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहेत. प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था अर्धवट असून हे स्टॉप उघड असल्यामुळे पावसाळ्यात भिजत प्रवाशांना बसची वाट पाहावी लागणार आहे.

High Court delivers strong words on panjim Smart City
Instagram Fraud Case | मैत्रीला काळिमा! इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून 14 वर्षीय मैत्रिणीला 15 लाखांना लुटले

पणजी महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील अनेक ठिकाणी असे लाखो रुपये खर्चुन बस स्टॉप उभारण्यात आले आहेत. पावसाळ्यातील बससाठी प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना त्रासदायकच ठरणार आहेत. मांडवी तीरावरील या बस स्टॉपवर वादळी वाऱ्यासह पावसाचे पाणी अंगावर झेलण्याच्या समस्येला प्रवाशांना सामोरे जावे लागणार आहे. या शेडच्या मागे आडोसा लावणे अत्यंत जरुरीचे असून इमेजिन पणजीने त्याची पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news