Panaji Municipal Election 2026 | मतदनाचा टक्का घटला; फटका कोणाला ?

Panaji Municipal Election 2026 | पणजी महापालिकेसाठी ६०.०७ टक्के मतदान
Panaji Municipal Election 2026
Panaji Municipal Election 2026
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजी महापालिकेच्या ३० प्रभागांसाठी बुधवारी ६९.०७टक्के मतदान झाले. २०२१ मध्ये महापालिकेसाठी ७०.१९ टक्के मतदान झाले होते. यावेळी त्यात १.१२ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे मतदानाचा घटलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, याकडे आता समस्त पणजीवासीयांचे लक्ष लागून राहिले आहेत.

Panaji Municipal Election 2026
Panjim Muncipal Corporation | पणजी महापालिकेसाठी 60.07 टक्के मतदान, 13 मार्च रोजी मतमोजणी

२०२१ मध्ये भाजप व मंत्री बाबूश मोन्सेरात समर्थक पॅनलने ३० पैकी २५ जागा पटकावल्या होता. बुधवारी मतदान शांततेत झाले. ३० जागांसाठी ६९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून शुक्रवार दि. १३ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

निकालानंतर पणजी महापालिकेवर मंत्री बाबूश मोन्सेरात की उत्पल पर्रीकर यांची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. भाजपने पाठिंबा दिलेल्या मोन्सेरात यांच्या प्रोग्रेसिव्ह पणजी पॅनेलला पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय आम्ही पणजीकर पॅनेल कडवी झुंज दिली आहे.

बुधवारी दुपारी १२ पर्यंत ३३.६४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ६२. २४ टक्के मतदानाची नोंद झाली. मात्र, शेवटच्या टप्प्यात जास्त मतदान होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत असताना ६९.०७ टक्के इतके मतदान झाले.

या निवडणुकीत मोन्सेरात कुटुंबाची प्रतिष्ठ पणाला लागली असून उत्पल पर्रीकर यांचे राजकीय भवितव्यही पणाला लागले आहे. पणजी मनपाच्या ३० प्रभागांसाठी एकूण ६९ उमेदवार रिंगणात आहेत. २३ प्रभागांत दुहेरी, ६ प्रभागांत तिहेरी तर प्रभाग क्रमांक २६ मध्ये सर्वाधिक ५ उमेदवार आहेत.

ताळगाव विधानसभा मतदारसंघात प्रभाग १ ते ९ येतात तर पणजी मतदारसंघात प्रभाग १० ते ३० येतात. यापैकी २८, २९ व ३० हे तीन प्रभाग रायबंदर येथील आहेत. २०२१ च्या मनपा निवडणुकीत १०६ उमेदवार रिंगणात होते. यावेळी ६९ उमेदवार रिंगणात आहेत.

१३ रोजी बांबोळी येथील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयमवर सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. प्रभाग २३ मध्ये सर्वाधिक मतदान... सर्वात जास्त मतदान प्रभाग २३ मध्ये ८१.२० टक्के झाले तर सर्वात कमी मतदान प्रबाग क्रमांक ३ मध्ये ५३.०९ टक्के झाले.

Panaji Municipal Election 2026
Goa Agriculture Schemes 2026 | सत्तरीतील शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांसाठी योजना कार्यान्वित

महिला मतदारांची संख्या जास्त...

महापालिकेसाठी १५, २२५ पुरुष व १७, २७१ महिला अशा एकूण ३२,४९६ मतदारांना मतदानाचा हक्क होता. त्यापैकी १०,५७५ पुरुषांनी व ११,८७० महिलांनी असा प्रकारे ३२,४९६ पैकी २२,४४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे महिलाच पणजी महापालिकेवर सत्ता कुणाची हे ठरवण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news