Panaji Municipal Election Result 2026 | पणजीचा 'किंग' कोण? बाबुश मोन्सेरात गड राखणार की उत्पल पर्रीकर परिवर्तन घडवणार?

Panaji Municipal Election Result 2026 | बाबुश सत्ता राखणार की उत्पलकडून होणार परिवर्तन
Panaji Municipal Election Result 2026
Panaji Municipal Election Result 2026
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजी महापालिका निवडणुकीची मतमोजणी आज शुक्रवारी, दि. १३ रोजी होत असून पणजी महापालिकेवर सत्ता कुणाची याचा फैसला दुपारपर्यंत होणार आहे. या निवडणुकीत महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात हे मनपावरील सत्ता टिकवण्यात यशस्वी ठरतात की उत्पल पर्रीकर हे घराणेशाही व कॅसिनो या मुद्द्यांवरून परिवर्तन घडवतात, याकडे अवघ्या पणजीकारंचे लक्ष लागले आहे.

Panaji Municipal Election Result 2026
Goa LPG Crisis |गोव्यात सिलिंडर संकट? मुख्यमंत्री म्हणाले, "पंधरा दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध, अफवांवर विश्वास ठेवू नका"

शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर मतमोजणी होणार आहे. मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात आले असल्याने अंतिम निकाल दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. ३० प्रभागासाठी ६९ उमेदवार उभे असून तब्बल २३ प्रभागात दुरंगी लढत झाली आहे. ६०.०७ टक्के मतदान झाले आहे.

२०२१ च्या निवडणुकीत भाजप व मंत्री बाबुश समर्थक प्रोग्रेसिव्ह पॅनलला ३० पैकी २५ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळी नेमक्या किती जागा प्रोग्रेसिव्ह पॅनेलला मिळणात की उत्पल पर्रीकर यांचे आम्ही पणजीकर पॅनेल सत्ता खेचून घेणार याची सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली आहे.

घराणेशाहीचा मुद्दा आम्ही पणजीकर पॅनेलचे प्रमुख उत्पल पर्रीकर यांनी प्रचारात लावून धरला होता. पणजीमध्ये बाबुश मोन्सेरात हे आमदार असून ते सरकारमध्ये महसूमंत्री असून ताळगावमध्ये बाबुश यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात आमदार आहेत. गेली अनेक वर्षे महापालिकेवर मोन्सेरात यांच्या गटाची सत्ता आहे.

गेली पाच वर्षे रोहित मोन्सेरात हे महापौर आहेत. त्यामुळे उत्पल पर्रीकर यांनी घराणेशाहीचा मुद्दा मतदारापर्यंत पोचवला आहे. मांडवीत कॅसिनो नको, ही मोहीमही पणजीकरांनी सुरू केली आहे. निवृत्त न्यायमूर्ती फेर्दीन रिबेलो यांनी या मोहिमेला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत हे मुद्दे पणजीच्या मतदारांना पटले व या मुद्द्यावर जर पणजीकरांनी मतदान केले तरच महापालिकेत सत्ता बदल शक्य आहे.

Panaji Municipal Election Result 2026
Iran America conflict | दोन दिवसांत ८० इंडक्शन स्टोव्ह विकले : आयुष्यात एवढी विक्री कधीच पाहिली नाही!

विधानसभेच्या उमेदवारीवर प्रभाव करणारा निकाल

पणजी विधानसभा मतदारसंघात आपणाला भाजपची उमेदवारी मिळावी, अशी मागणी २०२२ मध्ये उत्पल पर्रीकर यांनी केली होती. मात्र, विद्यमान आमदार म्हणून बाबुश मोन्सेरात यांना भाजपची उमेदवारी मिळाली.

ते निवडून आले. मात्र, अपक्ष राहिलेल्या उत्पल पर्रीकर यांनी त्याना जोरदार टक्कर दिली. अवघ्या १५०० मतांनी मोन्सेरात निवडून आले. उत्पलना भाजपची उमेदवारी मिळाली असती तर तेही जिंकले असते. आता २०२७ च्या निवडणुकीत पणजीतील उमेदवारी महापालिकेच्या निकालावर ठरणार अशी चर्चा असल्याने या दोन्ही नेत्यांसाठी महापालिका निकाल त्यांचे राजकीय भवितव्य ठरवणारा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news