Goa Fish Prices | पणजीत इसवण, पापलेटची आवक घटली

Goa Fish Prices | पापलेट महागच, इतर माशांची आवक वाढली; दोड्या, बांगड्यांना पसंती
Goa Fish Price Hike
Goa Fish Price Hike
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजीत रविवारी इसवण, पापलेटची आवक कमी असल्याचे दिसले. त्यामुळे पापलेटचा स्थिर म्हणजे १,००० ते १,२०० रुपये किलो होता. इसवण ८०० ते १,००० रुपये किलो होता. मात्र, इतर माशांची आवक वाढली होती.

Goa Fish Price Hike
Veer Madhoba Maharaj Procession | हळदीचा नवरदेव ते नवसाला पावणारा वीर! नाशिकमध्ये मधोबा महाराजांच्या 300 वर्षांच्या परंपरेचा उत्साह

एरवी क्वचित दिसणारे राणे मासे यावेळी दिसले. त्यांचा आकार मोठा असल्याने ४०० रु. किलो दराने मिळत होते. बाजारात मोठे माणके उपलब्ध होते. त्यांचा दर २५० ते ३०० रुपये किलो होता.

कोकारी, दोडया ४०० रु. किलो, तर बांगडे २५० ते ३०० रु. किलो मिळत होते. या माशांना ग्राहकांची पसंती दिसली. या आठवड्यात इसवण, पापलेट वगळता इतर माशांचा दर सर्वसामान्यांना परवडेल असाच होता.

Goa Fish Price Hike
Panaji Shigmostav 2026 | पणजीत आजपासून शिमगोत्सवाची धूम

मासळी बाजारात मोठे बांगडे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले होते. त्यांचा दर २५० ते ३०० रु. किलो, तर मध्यम बांगडे १५०-२०० रु. किलो दराने मिळत होते. शिनाणे आकारानुसार ५०० ते ६०० रु. किलो दराने मिळत होते. कालवांचा दरही आकारानुसार २०० ४०० रु. वाटा असाच होता.

शिनाणे, कालवा नेहमीच उपलब्ध असत नाहीत, त्यामुळे त्यांचा दर थोडा अधिक असतो. तिसरे ५०० रु. ना १०० मिळत होते. खूबे ३०० ते ४०० रुपये १०० या दराने मिळत होते. मोडसो आणि चणाक मासा ५०० रुपये किलो दराने मिळत होता. काही विक्रेत्यांनी चणाक माशांचे वाटे लावले होते. ते २०० रुपयांना एक आणि ३०० रुपयांना २ या दराने मिळत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news