Goa Fish Price news | पणजीत इसवण १ हजार, पापलेट बाराशेला

Goa news | पणजीत इसवण १ हजार, पापलेट बाराशेला
Goa fish price
Goa fish price newsfile photo
Published on
Updated on

पणजी : पणजीत रविवारी इसवणचा दर १,००० रु किलो, तर पापलेटचा दर १,२०० रुपये होता. बाजारात मोठे माणके (स्क्विड) उपलब्ध होते. त्यांचा दर ३०० ते ३५० रुपये किलो होता. मोठे बांगडे २५० ते ३०० रु. किलो मिळत होते. या आठवड्यात इसवण, पापलेटसह इतर माशांचा दरही वाढला होता. मासळी बाजारात मोठे बांगडे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले होते. त्यांचा दर २५० ते ३०० रु. किलो, तर मध्यम बांगडे १५०-२०० रु. किलो दराने मिळत होते.

शिनाणे मासळी बाजारात नव्हते. पण, जुने गोवा परिसरात आकारानुसार ५०० ते ६०० रु. किलो दराने मिळत २०० ४०० रु. वाटा असा होता. मध्यम तिसरे ५०० रु.ना १०० मिळत होते. खुबे ३०० ते ४०० रुपये १०० या दराने मिळत होते. मोडसो आणि चणाक मासा ५०० रुपये किलो दराने मिळत होता. काही विक्रेत्यांनी चणाक माशांचे वाटे लावले होते. ते ३०० रुपयांना एक आणि ५०० रुपयांना २ या दराने मिळत होते.

पणजीत कांदा, टोमॅटोचा दर उतरला; आले, लसूणचा दर वाढलेलाच

पणजी बाजारात या रविवारी भाज्यांचे दर स्थिर होते. बटाटा ४० रुपये किलो असून कांदा, टोमॅटोचा दर ३० रुपये किलो होता. फलोत्पादन महामंडळाच्या स्टॉलवर कांदा, बटाटा, टोमॅटो अनुक्रमे २३,३४,३१ असा दर होता. आले व लसूणचा दर मात्र दोन्ही ठिकाणी वाढलेलाच दिसला. बाजारात लसूण २५० ते ३२० रु. किलो, तर फलोत्पादनकडे २३८ रु. दर आहे. आल्याचा दर बाजारात १६० तर फलोत्पादनकडे १०७ रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news