Betki Khandola Road | बेतकी खांडोळा येथे फांद्या, झुडपे अपघाताला कारणीभूत

Betki Khandola Road | पंचायतीचे दुर्लक्ष; बेजबाबदारपणाचा कळस, तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी
Betki Khandola Road
Betki Khandola Road
Published on
Updated on

माशेल : पुढारी वृत्तसेवा
बेतकी खांडोळा पंचायत क्षेत्रात विविध ठिकाणी झाडांच्या फांद्या व झुडपांनी रस्ते वेढलेले असून ती दररोज लहान-मोठ्या अपघातांना आमंत्रण देत आहेत. खांडोळा येथील गावकरवाडा प्राथमिक शाळा ते पंचायत पर्यंत अंतर्गत रस्त्याला पावसामुळे बरेच खड्डे पडले आहेत. तसेच अनेक ठिकाणी झाडां-झुडपांच्या वेली रस्त्यावर आल्या आहे.

Betki Khandola Road
CM Pramod Sawant | गोव्यात सक्तीच्या धर्मांतरासाठी आता जन्मठेपेची शिक्षा; गोवा बेकायदा धर्मांतर प्रतिबंधक विधेयक 2026 ला मंजुरी!

काही ठिकाणी पावसाच्या पाण्याबरोबर कचरा, चिखल व माती वाहून रस्त्यावर येऊन पडली आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठे जाडजूड मातीचे थर निर्माण झाले आहे. त्यात पाणी साचून डबकी बनली आहेत. या सर्व रस्त्यावरील अडथळ्यांना चकवा देताना बऱ्याचदा वाहन चालकांमध्ये लहान मोठे अपघात घडतात.

झुडपे एवढी वाढली आहे की, दोन्ही बाजूने वाहने येत असल्यास वाहन चालक बाजू देण्यासाठी गाडी रस्त्याच्या कडेवर घेण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी जलवाहिनी टाकण्यासाठी खोदलेले चर आणि खड्ड्यांमध्ये गाडी रुतून बसते.

या धोकादायक रस्त्यावरून चालून जातांना पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. मात्र, तरीही पंचायत अजूनही जागी होत नाही. पंचायतीने वेळोवेळी ही कामे हाती घेतली पाहिजे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Betki Khandola Road
Mumbai Goa Highway: गोवा महामार्गाचे काम गणेशोत्सवापूर्वी पुर्ण करा, शिवसेनेची मागणी

इतर ठिकाणीही तीच समस्या


तामसुली येथील वडाच्या झाडाजवळ वळणावर झुडपे बाहेर रस्त्यावर आलेली आहे. देवळाय जंक्शन ते कॉलेज अंतर्गत रस्त्याच्या कडेला झुडपे वाढली आहे. तामसुली साईबाबा मंदिर ते चिकन सेंटर अशा अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडेझुडपे आलेली असून ती वाहन चालक व पादचाऱ्यांना त्रासदायक ठरत आहेत. पंचायतीने काम ताबडतोब हाती घ्यावे व वाहन चालक आणि पादचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news