Majhe Ghar zoning certificate- एकच झोनिंग सर्टिफिकेट ग्राह्य धरावे : गावडे

अधिकाऱ्यांना आदेश देण्याची केली मागणी : 'माझे घर' योजनेसंदर्भात विधानसभेत लक्षवेधीवर चर्चा
Minister Govind Gawde
मंत्री गोविंद गावडे Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : 'माझे घर' योजनेसंदर्भात आमदार संकल्प आमोणकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेत बोलताना आमदार गोविंद गावडे यांनी कोमुनिदाद, जिल्हाधिकारी यांना स्पष्ट आदेश द्यावेत, असे बुधवारी विधानसभेत सुचवले. दरम्यान, एक झोनिंग सर्टिफिकेट घ्यायचे तर ३,००० रुपये खर्च होतात. एकाच झोनिंगमधील प्रत्येकाकडे स्वतंत्र सर्टिफिकेट मागण्यापेक्षा त्याच सर्टिफिकेटची झेरॉक्स ग्राह्य धरावी. त्यामुळे अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देण्याची मागणी गावडे यांनी केली.

Minister Govind Gawde
Tilari water supply-तिळारीचे पाणी बंद; बार्देशला फटका

आमदार मायकल लोबो यांनी आमदार विजय सरदेसाई आणि विरोधकांनी 'माझे घर'ला विरोध केल्याचे म्हटले होते. त्यावर आमदार विजय सरदेसाई यांनी या युनिक योजनेत खूप अडचणी आहेत. आता ते स्पष्ट होत आहे. त्यामुळे आम्ही ही योजना केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईघाईत जाहीर न करता अभ्यास करून जाहीर करण्याची मागणी केली होती, असे सांगून सरदेसाई यांनी माझे घरसाठी केलेले अर्ज आणि नाकारले गेलेले अर्ज यांची आकडेवारीच सभागृहासमोर मांडली.

ही योजना युनिक किंवा मुख्यमंत्र्यांना पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर, मनोहर पर्रीकर यांच्या रांगेत सत्ताधारी आमदार बसवत असतील, तर अर्ज मोठ्या संख्येने रिजेक्ट का होत आहेत, असा प्रश्न विचारला.

Minister Govind Gawde
फोंड्यात आओ-जाओ घर तुम्हारा...

मुख्यमंत्री म्हणाले...

  • कोमुनिदादमधील घरे नियमित करणार

  • घरासाठी २२ खात्यात जावे लागते, तो आकडा ८ वर आणणार

  • रुका अंतर्गत असलेली २०५ घरे नियमित करणार

  • अस्तित्वातील घरे जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करणार

  • ३०-४० वर्षे गोव्यात राहणाऱ्या; पण घरे नसणाऱ्यांना घर किंवा फ्लॅट देणार

  • गेल्या ६ महिन्यांतील अर्ज छाननी करून 'माझे घर' देणार

  • सामाईक घरात आपल्या भागात घर बांधणाऱ्याला लगतच्याने एनओसी दिल्यास घर बांधायला परवानगी देणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news