Srinivas Naik Goa Firing Case | गोव्यात खळबळ! कॅसिनो संचालक श्रीनिवास नायक यांना मारण्यासाठी 1 कोटींची सुपारी; संशयितांचा धक्कादायक खुलासा

Srinivas Naik Goa Firing Case | संशयितांचा दावा : सतीश शिंदे, सूरज आचार्यची चौकशी
श्रीनिवास नायक
श्रीनिवास नायक
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पर्वरी येथील गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात कॅसिनो संचालक श्रीनिवास नायक यांना लक्ष्य करण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा दावा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ही सुपारी देणारा गोपाळ नाईक हा सध्या फरारी असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी क्राईम ब्रांचने तपासाची चक्रे वेगाने सुरू केली आहेत.

श्रीनिवास नायक
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

पोलिसांच्या माहितीनुसार, ही कथित सुपारी गोपाळ नाईक, सतीश शिंदे आणि सूरज आचार्य यांनी दिल्याचे पाच संशयितांनी आपल्या जबाबात सांगितले आहे. या तिघांची या प्रकरणातील कथित भूमिका तपासाच्या केंद्रस्थानी असून, पोलिसांकडून त्याबाबत सखोल चौकशी केली जात आहे.

संशयित सतीश शिंदे याने त्याला कॅसिनो व्यवसायाचा आधार घेऊन क्राईम ब्रांचने अडकवले आहे, असा दावा उच्च न्यायालयात केलेल्या अर्जात केला आहे; मात्र त्याच्या या अर्जाला श्रीनिवास नायक यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करून विरोध केला आहे. या प्रकरणातील संशयित प्रमुख सूत्रधारांपैकी एक असलेला गोपाळ नाईक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी, तसेच गोळीबारामागील कथित कटाचा उलगडा करण्यासाठी तपास यंत्रणा विविध बाजूंनी तपास करत आहे.

श्रीनिवास नायक
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

यापूर्वी शूटर संशयित अपुर्थराज उर्फ अण्णा नडार याने अटक होण्यापूर्वी श्रीनिवास नायक यांच्यावर पिस्तुलाने गोळीबार करण्यासाठी एक कोटीची रक्कम देण्याचे आमिष दाखवले होते; मात्र त्यातील २५ लाख आगाऊ रक्कम दिल्याचे त्याने व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले होते. त्यामुळे क्राईम ब्रांच या त्याच्या जबाबाचीही शहानिशा करत आहेत. ही रक्कम कोणी दिली याचीही माहिती पोलिस घेत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

एक कोटींच्या कथित करारामागे नेमके कोण?

पर्वरी येथील गोळीबार प्रकरणात अटक केलेल्या पाचही आरोपींचे जबाब सध्या तपासाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. कथित १ कोटींच्या करारामागे नेमके कोण होते, त्यासाठी आर्थिक व्यवहार झाला काय आणि गोळीबाराच्या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा कसून तपास सुरू आहे. पर्वरी गोळीबारामागील सुपारी, सूत्रधार आणि संभाव्य आर्थिक व्यवहाराचा तपशील तपासातून पुढे येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news