Onkar Elephant: ओंकार हत्ती पुन्हासिंधुदुर्गात

ओंकार हत्ती पुन्हा सिंधुदुर्गात; तांबोसेवासीयांना तात्पुरता दिलासा
Onkar Elephant
Onkar ElephantPudhari
Published on
Updated on

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

गणेश चतुर्थीच्या उत्सवात तांबोसे परिसरात दाखल झालेल्या 'ओंकार' हत्तीने दिवसभर शेती-बागायतीचे नुकसान केल्यानंतर रात्री उशिरा तेरेखोल नदी ओलांडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कास परिसराच्या दिशेने कूच केले. त्यामुळे गेल्या दिवसभरापासून भीतीच्या सावटाखाली असलेल्या तांबोसे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी तात्पुरता सुटकेचा श्वास घेतला आहे.

Onkar Elephant
Goa Assembly Election - कुडचडेत भाजप प्रबळ; काब्राल नव्हे !

१७ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजता ओंकार हत्ती तांबोसे परिसरात दाखल झाला. त्याने काही ठिकाणी भातशेती तसेच बागायतींचे नुकसान केले. त्यानंतर त्याचा वावर लोकवस्तीच्या दिशेने झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी दुचाकी वाहनांचेही नुकसान करण्याचा त्याने प्रयत्न केल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. दरम्यान, वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी त्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून होते.

Onkar Elephant
Goa Casino Businessman Shooting| कॅसिनो व्यावसायिकावरील गोळीबार पूर्ववैमनस्यातून, संशयितांच्या जबाबांमधून क्राईम ब्रँचचा निष्कर्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news