Omkar Elephant | सावंतवाडीत 'ओंकार' हत्तीचा धुमाकूळ; मडुरा येथे थेट घरात घुसण्याचा प्रयत्न

Omkar Elephant | शेतात धुमाकूळ घालणाऱ्या 'ओंकार' हत्तीचे संकट आता थेट घरापर्यंत पोहोचले आहे.
Omkar Elephant Menace
Omkar Elephant Menace
Published on: 
Updated on: 

मडुरा : शेतात धुमाकूळ घालणाऱ्या 'ओंकार' हत्तीचे संकट आता थेट घरापर्यंत पोहोचले आहे. बुधवारी रात्री ७.१५ वा. च्या सुमारास ओंकार हत्ती चक्क मडुरा येथील बाबू शिरोडकर यांच्या घराच्या अंगणात घुसला आणि त्याने घरात घुसण्याचा प्रयत्न केला. अचानक अंगणात हत्ती आल्याने घरातील सदस्यांची एकच तारांबळ उडाली.

Omkar Elephant Menace
Omkar Elephant | ‘ओंकार’ हत्तीचा मडुरा परिसरात धुमाकूळ

काहीवेळ घरात भीतीचे वातावरण पसरले होते. आरडाओरड झाल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने हत्तीला पुन्हा जंगलाच्या दिशेने पिटाळून लावण्यात यश आले.

'ओंकार' वर मशाल फेक प्रकरणी कडक कारवाई : जिल्हा उपवनसंरक्षक मिलिश शर्मा

सावंतवाडी तालुक्यातील कास गावामध्ये शांतपणे स्वच्छंद विहार करणाऱ्या 'ओंकार' हत्तीवर चक्क पेटत्या मशाली फेकण्याचा अमानुष प्रकार नुकताच उघडकीस आला. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांसह वन्यजीव प्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेत वनविभागाकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या ३ वनरक्षक आणि ४ हाकारे अशा एकूण ७ जणांना वन विभागाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news