New Catfish Species | पश्चिम घाटात आढळला दुर्मिळ शिंगळ्या

New Catfish Species | गोव्यासह महाराष्ट्रातही अधिवास : संशोधकांच्या संयुक्त प्रयत्नांना यश
New Catfish Species
New Catfish Species
Published on
Updated on

पणजी : काव्या कोळस्कर

जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटातील गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात शिंगळ्या (कॅटफिश) माशाच्या नव्या जातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे.

New Catfish Species
Nashik Gas Cylinder Booking 2026 | बुकिंगनंतर तीन दिवसांत गॅस सिलिंडर घरपोच

हा मासा उथळ डोंगरी प्रवाहांमध्ये आढळतो. अशा प्रवाहांच्या तळाशी वाळू, गोटे आणि दगड यांचे मिश्रण आढळते, जे या माशाला लपण्यासाठी आणि अन्न शोधण्यासाठी योग्य सूक्ष्म अधिवास उपलब्ध करून देते.

गोव्यातील सत्तरी येथील रगाडा नदीत व रायगड जिल्ह्यातील कोलाडमधील कुंडलिका या नदीत दुर्मिळ माशांचा अधिवास आढळून आला आहे. या संशोधनामध्ये स्वतंत्र संशोधक बालाजी विजयकृष्णन (चेन्नई) व ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे (मुंबई) आणि अभिषेक शिर्के (कोल्हापूर) यांचा सहभाग होता.

नव्याने शोधलेल्या माशाचा समावेश 'अॅम्ब्लिसेप्स' या कुळामध्ये केला आहे. पश्चिम घाटातील गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये अधिवास असणाऱ्या या माशाचे नामकरण 'अम्लीसेप्स वायव्य' असे करण्यात आले आहे. मराठी भाषेत 'वायव्य' (उत्तर-पश्चिम) असा अर्थ होतो, जो या प्रजातीच्या उत्तर-पश्चिम घाटातील वास्तव्याच्या संदर्भान देण्यात आला आहे. तसेच, पश्चिम घाटाच्या उत्तरेकडील भागात अॅम्ब्लिसेप्स या वंशाचे मासे आढळण्याची ही पहिली नोंद आहे.

बदलत्या घटकांचा दुर्मिळ प्रजातींवर परिणाम : शिर्के

खाणकाम, औद्योगिक सांडपाण्याचा निचरा, मायक्रोप्लास्टिकचे प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे सोडलेल्या माशांच्या परकीय प्रजाती यांसारख्या घटकांमुळे येथील जलपरिसंस्थांवर धोका निर्माण होत आहे. या संशोधनातून 'अम्लीसेप्स वायव्य' या नव्या प्रजातीचा शोध पश्चिम घाटातील संवेदनशील अधिवासांच्या पर्यावरणीय अभ्यासाची गाज खनाल अवासाच्या कोल्हापुरातील संशोधक अभिषेक शिर्के यांनी व्यक्त केले.

New Catfish Species
Nashik Heatwave 2026 | नाशिकमध्ये उन्हाचा कडाका! उष्माघाताचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग 'अलर्ट', जिल्हाभर विशेष कक्ष सज्ज

असा दिसतो मासा...

दुभंगलेली शेपटी, अपूर्ण मध्यरेषा, शेपटीच्या मध्यभागी असणाऱ्या शिरांमध्ये आकड्यासारख्या रचनेचा अभाव, तसेच शेपटीच्या पृष्ठगामी प्रवाही भागाशी एकरूप न होता स्पष्टपणे वेगळी असलेली अॅडिपोज फिनची रचना या माशाला त्याच्या कुळातील इतर प्रजातींपासून वेगळी ओळख देते.

गोवा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनासाठी प्रसिद्ध असले तरी हा परिसर पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधता जपणारा एक महत्त्वपूर्ण अधिवास मानला जातो. या प्रजातीची नोंद सध्या गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधील काही मर्यादित ठिकाणांवरूनच झाली आहे. या दोन्ही ठिकाणांमधील अंतरही लक्षणीय असल्यामुळे या प्रजातीचे मासे खूपच कमी आणि विखुरलेले आढळतात. त्यामुळे या भागांतील ओढे आणि प्रवाह यांसारख्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा संवेदनशील अधिवासांचे जतन केल्यास केवळ या प्रजातीचेच नव्हे तर गोड्या पाण्यातील इतर अनेक माशांच्या प्रजातींचेही संरक्षण होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news