NEET student end of life note |'मला या स्पर्धा परीक्षा द्यायच्या नाहीत, या चक्रात अडकवू नका', नोटमधील शब्द डोळे पाणावणारे

'नीट' विद्यार्थ्याने जानेवारीतच घेतला होता जीवन संपवण्याचा निर्णय
student end of life
student end of lifefie photo
Published on
Updated on

मडगाव : मायणा-कुडतरी परिसरातील १७ वर्षीय विद्यार्थ्याने 'नीट-यूजी २०२६' परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण गोवा हादरला असतानाच, आता त्याची सुसाईड नोट समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने आत्महत्येचा निर्णय हा अचानक घेतलेला नव्हता, असे उघड झाले आहे. 'This was not a sudden decision. I planned it all at the start of 2026 itself,' असे स्पष्ट शब्दांत त्याने नमूद केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो मानसिक संघर्षातून जात होता आणि स्पर्धा परीक्षा, भविष्यातील अनिश्चितता तसेच स्वतःला सिद्ध करण्याच्या दबावाखाली पूर्णपणे खचला होता, असे या पत्रातून स्पष्ट होत आहे.

'मी स्वतःलाच हरवून बसलो... आता पुढे जगण्याची ताकद उरलेली नाही,' अशा आशयाचे भावनिक शब्द लिहीत विद्यार्थ्याने मानसिक संघर्षाची वेदना व्यक्त केली आहे. मृत विद्यार्थी मूळचा बंगळूर येथील असून तो मडगाव परिसरातील एका नामांकित उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. मंगळवारी दुपारच्या सुमारास घरात कोणी नसताना विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले. त्याची आई व बहीण काही दिवसांसाठी मूळ गावी गेल्या होत्या, तर वडील रेल्वेमध्ये गार्ड म्हणून ड्युटीवर होते. सायंकाळी वडील कामावरून परतल्यानंतर मुलगा खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

student end of life
Viresh Borkar claim on RG | वीरेश बोरकर यांचा 'आरजी'वर दावा?

घटनेची माहिती मिळताच मायणा-कुडतरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांना इंग्रजीत लिहिलेली सुसाइड नोट सापडली. त्यामध्ये विद्यार्थ्याने मानसिक तणावाचा, सततच्या स्पर्धेच्या दबावाचा आणि निराशेचा उल्लेख केला आहे. 'Life has been tough lately... I have exhausted myself,' अशी सुरुवात असलेल्या या पत्रात त्याने स्वतःच्या भावनिक तणावाचे अत्यंत स्पष्ट शब्दांत वर्णन केले आहे. 'मी सतत स्वतःला समजावत होतो की सर्व काही ठीक होईल; पण आता मी पूर्णपणे थकलो आहे. मला अभ्यासावर आणि हॉकीवर लक्ष केंद्रित करता येत नाही. मी माझ्या कुटुंबाला निराश केले,' असे त्याने लिहिले आहे.

student end of life
Goa government vehicles reduction| मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाहनांत केली कपात

स्पर्धा परीक्षांचा दबाव

स्पर्धा परीक्षांच्या दबावाबद्दल बोलताना विद्यार्थ्यान, 'I don't want to write these competitive exams. I don't want to get trapped in that competitive cycle again,' असे नमूद केले आहे. या ओळींनी शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या मानसिक दडपणाचे भीषण वास्तव पुन्हा समोर आणले आहे.

कुटुंबीयांसाठी लिहिलेल्या शेवटच्या संदेशात त्याने 'Thank you for ev-erything Akka, Amma and Appa," असे लिहीत आपल्या आई-वडील आणि बहिणीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. या ओळींनी परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. दरम्यान, मायणा-कुडतरी पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news