

Goa government vehicles reduction
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी (दि. १४) गुरुवारपासून आपल्या ताफ्यातील वाहनांत कपात करत फक्त एकच वाहन वापरण्यास सुरुवात केली आहे. आता मार्ग दाखवण्यासाठी पोलिसांची एक गाडी मुख्यमंत्र्यांच्या वाहनासमोर राहते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनचा वापर कमी करण्याचे केलेले आवाहन पाळत आपण आपल्या ताफ्यातील वाहने हटवली आहेत. येत्या काही दिवसांत आपण इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास सुरुवात करणार आहे, असे ते म्हणाले. बिट्स पिलानी येथील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणी जिल्हाधिकारी चौकशी करत आहेत, आपण त्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत, असे या विषयावर बोलताना ते म्हणाले.
कामगारांचा इन्शुरन्स हप्ता भरणार
गोव्यातील जे कामगार खासगी उद्योगांत कामाला आहेत. त्यांचा इन्शुरन्स हप्ता गोवा सरकार भरेल. त्यासाठी बँकांनी सहकार्य करावे, अशा सूचना आपण बँक अधिकाऱ्यांना केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बँक अधिकाऱ्यांच्या बैठकी-नंतर बोलताना दिली. २० पेक्षा जास्त वर्षे खासगी क्षेत्रात काम केलेल्या कामगारांना सरकार १५ हजार रु. बोनस स्वरूपात लवकरच देणार असल्याचेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.