'मुरगावचा राजा' मंडपावरील कारवाई स्थगित

मुख्याधिकारी आजारी : समितीच्या सदस्यांनी दिला होता आत्मदहनाचा इशारा
मुरगावचा राजा मंडप पाडण्यास विरोध करणाऱ्यांशी चर्चा करताना मामलेदार प्रवीणजय पंडित. (छाया : शेखर कळंगूटकर)
मुरगावचा राजा मंडप पाडण्यास विरोध करणाऱ्यांशी चर्चा करताना मामलेदार प्रवीणजय पंडित. (छाया : शेखर कळंगूटकर)
Published on
Updated on

दाबोळी : मुरगाव सडा येथील मुरगाव पत्तन प्राधिकरण (एमपीए) च्या जागेत उभारलेला 'मुरगावचा राजा सामाजिक विश्वस्त मंडळाचा' मंडप पाडण्याची कारवाई मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक आजारी असल्यामुळे स्थगित झाली.

मुरगावचा राजा गणेशोत्सव गेल्या १८ वर्षांपासून सडा येथील एमपीएच्या जागेत पुजला जात आहे. पण एमपीएने ही जागा आपली असल्याची उच्च न्यायालयात सिद्ध केल्यानंतर तो मंडप पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने २८ ऑगस्ट रोजी मुरगाव पालिकेबरोबर इतर संबंधित विभागांना दिला होता. शुक्रवारी (दि. २८) सकाळी मुरगावचे मामलेदार प्रवीणजय पंडित, मुरगावचे पोलिस अधीक्षक गुरुदास कदम घटनास्थळावर पोलिस यंत्रणेसह उपस्थित होते.

यावेळी मुरगावचा राजा मंडप पाडण्यापासून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. गणेश चतुर्थी काही दिवासांवर येऊन ठेपली असताना, मुरगावचा राजाचा मंडप पाडणे योग्य नसल्याचे स्थानिक रहिवाशी व समितीने उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. जर मंडप पाडल्यास मुरगावच्या राजाच्या समितीच्या सदस्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना दिला.

यावेळी मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी मंडपावर कारवाई स्थगित ठेवत असल्याचे जाहीर केले. पण चतुर्थीनंतर यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.मंडप पाडण्यास अधिकाऱ्यांना मुरगावचा राजाचे पदाधिकारी ओमकार दुर्भाटकर, उमेश मांद्रेकर, अनिल काणकोणकर, भावना भोसले, वेदांत चोडणकर, कांता मांद्रेकर, उद्धव पोळ व नागरिकांनी तीव्र विरोध केला.

मुख्याधिकाऱ्यांचे आजारी कनेक्शन

समितीच्या सदस्यांनी आत्मदहन रहिवाशी व समितीने उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. जर मंडप पाडल्यास मुरगावच्या राजाच्या यापूर्वीही मुख्याधिकारी सिध्दिविनायक नाईक गंभीररित्या आजारी पडले होते. त्यावेळी मुरगाव पालिकेत नगराध्यक्ष पदाची निवडणूक होती. त्यावेळी नाईक निर्वाचन अधिकारी होते. पण अचानक ते आजारी पडल्याने नगराध्यक्ष पदाची निवडणूक रद्द झाली होती. आज पुन्हा एकदा पालिकेचे मुख्याधिका नाईक आजारी असल्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन झाले नाही

मुरगावचा राजा मंडप पाडण्यास विरोध करणाऱ्यांशी चर्चा करताना मामलेदार प्रवीणजय पंडित. (छाया : शेखर कळंगूटकर)
Goa Fire News | चार वाहनांना भीषण आग; 60 लाखांहून अधिक नुकसान

कारवाईची टांगती तलवार कायम

मुरगावचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी मुरगावच्या राजाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले की, मंडप पाडण्याचा पूर्ण हक्क मुरगाव पालिकेच्या मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांना न्यायालयाने दिला आहे. ते सध्या आजारी असल्याने मंडप पाडण्याचे स्थगित ठेवले आहे. यामुळे आक्रमक भूमिका घेतलेले मुरगावच्या राजाचे पदाधिकाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. पण कारवाईची टांगती तलवार अजूनही कायम आहे.

मुरगावचा राजा मंडप पाडण्यास विरोध करणाऱ्यांशी चर्चा करताना मामलेदार प्रवीणजय पंडित. (छाया : शेखर कळंगूटकर)
Rat bites patient at Gomeco hospital |गोमेकॉमध्ये उंदराने कुरतडला रुग्णाचा पाय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news