Cyber Crime Case | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी मुकेश कुमार याला उत्तर गोवा विशेष न्यायालयाकडून तीन दिवसांची ईडी कोठडी

Cyber Crime Case | कांपाल-पणजी येथील दर्या संगम परिसरात कला अकादमीजवळ ३० वर्षीय मजुराची हत्या करून पसार झालेल्या दोन संशयितांना रेल्वे सुरक्षा दलान नाशिक येथे ताब्यात घेतले.
Parbhani Cyber Crime
Parbhani Cyber Crimepudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
देशभरातील कोट्यवधी रुपयांच्या कथित सायबर गुन्हेगारी आणि मनी लॉन्ड्रिंग रॅकेट प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या ठाणे (मुंबई) येथील ४६ वर्षीय मुकेश कुमार पुखराज जैन उर्फ 'मुकेश भाई' याला उत्तर गोवा विशेष पीएमएलए न्यायालयाने तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. जैन याला १९ ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Parbhani Cyber Crime
Floating Casinos Panajim | तरंगत्या कॅसिनोंमुळे पणजी शहरात वाढती वाहतूक कोंडी; उच्च न्यायालयाचे सरकारला तातडीने कारवाईचे निर्देश

गोवा ईडीने काल शुक्रवारी रात्री जैनला प्रतिबंधित मनी लॉन्ड्रिंग कायदा (पीएमएलए) अंतर्गत अटक केली होती. शनिवारी सकाळी त्याला मेरशी येथील विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. अटकेची प्रक्रिया आणि घटनात्मक सुरक्षेच्या तरतुदींचे पालन झाल्याची खात्री न्यायालयाने केली.

आर्थिक व्यवहारांची साखळी, अद्याप ओळख पटायचे दलाल आणि लपवून ठेवलेली रोख रक्कम याबाबत पुढील चौकशी करण्यासाठी जैनची कोठडी आवश्यक असल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. त्यानंतर विशेष न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसांची ईडी कोठडी मंजूर केली.

Parbhani Cyber Crime
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

या मनी लॉन्ड्रिंग तपासाची सुरुवात जून २०२५ मध्ये उत्तर गोवा सायबर क्राइम पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमधून झाली. दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून सायबर ठगांनी मडगाव येथील एका महिला आणि तिच्या पतीला चोवीस तास व्हिडिओ निगरानीखाली ठेवल्याचा आरोप आहे. महिलेला धमकावले आणि बनावट 'सीक्रेट सुपरव्हिजन अकाउंट'मध्ये २.६० कोटी स्थानांतरित करण्यास भाग पाडले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news