Goa Tourism Cyber Fraud | गोव्याच्या पर्यटनाला सायबर भामट्यांचा विळखा; खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत उठवला आवाज

Goa Tourism Cyber Fraud | खासदार सदानंद शेट तानावडे : कारवाईची मागणी
Cyber Crime
Cyber Fraud Case(Pudhari File Photo)
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्याच्या पर्यटनाला सायबर फसवणुकीचा फटका बसत आहे. हॉटेल बुकिंग, डिजिटल पेमेंटशी संबंधित ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणे वाढत आहेत. त्यातून पर्यटकांना जबर आर्थिक फटका बसण्याबरोबरच पर्यटनाचा आनंद लुटण्याऐवजी मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Cyber Crime
Goa Night Club News | नाईट क्लबमधील आतषबाजी बंद

खासदार सदानंद शेट तानावडे यांनी गोव्यातील तसेच अन्य राज्यांत वाढत असलेल्या अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी राज्यसभेत केली.

खासदार सदानंद शेट तानावडे यांनी शून्य प्रहरादरम्यान राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. गोवा हे एक जागतिक पातळीवरील प्रमुख पर्यटन केंद्र आहे. गोव्यात पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

Cyber Crime
Online Gaming Addiction | तरुणाईला गिळणारे मृत्यूचे ऑनलाईन सापळे

मात्र, सायबर फसवणुकीचा फटका गोवा व अन्य राज्यांच्या पर्यटनाला बसत आहे. नामांकित हॉटेल्स आणि बुकिंग पोर्टल्सच्या नावाने तयार केलेली बनावट हॉटेल्स, होमस्टे, फसव्या वेबसाईट्स यांतून पर्यटकांची मोठी फसवणूक होत असल्याचे ते म्हणाले.

केवायसी नियम लागू करा...

डिजिटल फसवणुकीचा गंभीर धोका गोव्याच्या व भारताच्या पर्यटन सुरक्षेला व प्रतिमेला असल्याचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. सरकारला पर्यटन संबंधित वेबसाईट्ससाठी कठार 'केवायसी' नियम लागू करण्याचे व फसव्या प्लॅटफॉर्मवर देखरेख ठेवून कारवाई करण्याची मागणी केली. पर्यटकांची शारीरिक सुरक्षा सुनिश्चति करण्याबरोबरच डिजिटल सुरक्षेवरही भर देण्याची मागणी खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news