Vasco Dangerous Buildings | 152 इमारतींना नोटिसा; 4 इमारतीच हटविल्या

Vasco Dangerous Buildings | वास्कोतील मागील 7-8 वर्षांतील स्थिती; पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर
dangerous buildings
dangerous buildingsAI photo
Published on
Updated on

वास्को : पुढारी वृत्तसेवा

मुरगाव पालिकेने पालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या धोकादायक इमारतीच्या मालकांना नोटिसा पाठविल्या आहेत. गेल्या ७-८ वर्षांचा आढावा घेतला तर आतापर्यंत ५२ विविध इमारतीसंबंधी नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी फक्त ४-५ इमारती मालकांनी थोकादायक इमारती पाडल्या आहेत. शहर भागातील एक इमारत पाडण्यासाठी एका बिल्डरला न्यायालयात याचिका दाखल करावी लागली होती.

dangerous buildings
Dangerous Buildings: मिरा-भाईंदर शहरात 453 इमारती धोकादायक

शेवटी न्यायालयाच्या आदेशानंतर सदर इमारत पाडण्यात आली. धोकादायक इमारतीमध्ये काही खासगी इमारती, उद्योजकांच्या इमारती, सरकारी इमारती, मुरगाव पालिकेच्या इमारतींचा समावेश आहे. सुमारे साडेनऊ वर्षांपूर्वी एका इमारतीचा सज्जा कोसळल्याने येथील असुरक्षित व धोकादायक इमारती चर्चेत आल्या होत्या. त्यामुळे याप्रकरणी दखल घेताना फेब्रुवारी २०१७असुरक्षित इमारतीची पाहणी करण्यात आली.

त्यावेळी ३२ इमारती असुरक्षित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर त्या इमारतींच्या संबंधितांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्या इमारतींसंबंधीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला तत्कालीन मुख्याधिकारी दीपाली नाईक यांनी दिली होती. नोटीसा देऊनही संबंधित इमारती मालकांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे दुसरया वर्षी तत्कालीन मुख्याधिकारी आग्नेलो फर्नाडिस यांनी पुन्हा नोटीसा देऊन पाठपुरावा सुरू केला होता.

गोवा पालिका कायदा १९६८ च्या १२० कलमांखाली त्या नोटीसा देण्यात आल्या होत्या. संबंधित इमारती मालकांनी नेहमीप्रमाणे त्या नोटिसांकडे दुर्लक्ष केले. या दरम्यान वास्को पोलिस स्थानकासमोर असलेल्या एका भव्य व असुरक्षित, विनावापर इमास्तीचा सज्जा खाली उभ्या असलेल्या कारवर कोसळण्याची घटना घडली होती. त्यामुळे संबंधित सर्व इमारती सक्षम व सुरक्षित असल्यासंबंधी प्रमाणपत्र सादर करण्यासंबंधी संबंधित मालकांना कळविण्यात आले होते.

प्रमाणपत्र सादर करण्याची तसदी कोणीच घेतली नाही. येथे असुरक्षित व धोकादायक इमारतींतील काही इमारती खाली करण्यात आल्या आहेत, काही इमारतीमध्ये अद्याप काही मोजकेच आपला जीव धोक्यात घालून राहतात. काही इमारती मालक व भाडेकरू यांचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळे काही तांत्रिक बाबी उपस्थित होत आहेत. या तांत्रिक बाबीवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक प्रशासनाने किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

ज्या इमारतींना नोटिसा देण्यात आल्या होत्या, त्यापैकी सी बिल्डिंग इमारत, आगई मॅशन, ईल्सा गोम्स, पुष्पांजली इमारत, शहर भागातील वर्दळीच्या ठिकाणी असलेली श्रीधर इमारत या इमारती संबंधित मालकांनी पाडल्या. यापैकी श्रीधर इमारत अतिशय चर्चेत आली होती. त्याखाली काही दुकाने होती.

या इमारतीच्या पदपथाचा उपयोग शेकडो पादचारी करीत होते. त्यामुळे ती पाडण्याची नितांत गरज होती. तथापी भाडेकरू व बिल्डर यांच्या काही तात्रिक करणास्तव बोलणी पुढे सरकत नव्हती. न्यायालयाच्या आदेशानंतर सदर इमारत पाडण्यात आल्यावर वास्कोवासीयांनी समाधानाचा सुस्कारा सोडला होता.

मुरगाव पालिकेची अतिशय धोकादाय ठरलेली जनता इमारतीही पाडण्यात आली. मुरगाव पालिकेच्या मालकीच्या मुकुंद इमारत, कोसंबी इमारत, बायणातील मासळी मार्केट, जुने भाजी मार्केट, पालिका मार्केट, बोर्जेस इमारत, शहर भागातील कर्मचारी वसाहत इमारत या इमारतींचा समावेश आहे. यापैकी काही इमारतीसंबंधी वाद न्यायालयापर्यंत गेल्याने सदर प्रकरण प्रलंबित आहे.

dangerous buildings
Dangerous Buildings: मिरा-भाईंदर शहरात 453 इमारती धोकादायक

पालिका कर्मचारी वसाहत इमारतींची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. त्यातील बरेच सदनिका खाली आहेत. इमारतीच्या बाहेरील भिंतीमध्ये पिंपळ, रानटी झाडे उगवली आहेत. सदर वसाहत इमारत पाडून त्याठिकाणी भव्य व्यावसायिक संकुल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने वास्कोच्या विकासासाठी दिलेल्या १४० कोटी रकमेपैकी काही रक्कम खर्च करण्यात येणार आहे.

बोगदा येथील इमारतीही धोकादायक

बोगदा येथील आयटीआय नजीकच्या पोलिस वसाहत इमारत, सडा येथील एमएमटीसी वसाहत इमारत या इमारती पाडण्यासंबंधी नोटिसा देण्यात आल्या होत्या. तथापी त्या अद्याप पाडण्यात आलेल्या नाही. काही घरांचाही या असुरक्षित इमारतीमध्ये समावेश आहे. ती घरे पोर्तुगीज कालीन असून पदपथाच्या किंवा रहदारीच्या ठिकाणी आहेत, त्यामुळे ती पाडण्यासंबधी नोटीसा देण्यात आल्या आहेत. काही उद्योजकांना त्यांच्या असुरक्षित इमारतीसंबंधी नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news