MLA Viresh Borkar | "आमदार वीरीश बोरकर यांची आरजीपीमधून हकालपट्टी!; पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द"

MLA Viresh Borkar | कार्यालय पुन्हा सुरू : खोलकर गटाकडून बोरकरांच्या नोटीसीला केराची टोपली
Viresh borkar strike goa
Viresh borkar strike goa
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाने (आरजीपी) पक्षाचे सदस्य आमदार वीरीश बोरकर यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून तत्काळ प्रभावाने हकालपट्टी करण्यात आल्याची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाच्या संविधानातील तरतुदींनुसार आणि त्यांच्याविरोधात राबवण्यात आलेल्या शिस्तभंग कारवाईची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Viresh borkar strike goa
Goa Theatre Artist Leena Naik Desai | रंगभूमीवर दमदार ठसा उमटवणारी अभिनेत्री : लीना नाईक-देसाई

शिस्तभंगाच्या कारवाईनंतर आरजीपी पक्षाने म्हटले आहे की, बोरकर यापुढे कोणत्याही क्षमतेने आरजीपीचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत किंवा पक्षाच्या वतीने निवेदने देऊ शकत नाहीत. तसेच, त्यांनी पक्षाच्या नावाने केलेल्या कोणत्याही संवादाकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन जनतेला आणि प्रशासनाला केले आहे.

दरम्यान, आरजीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आमदार वीरीश बोरकर यांनी पाटो, पणजी येथील पक्षाचे कार्यालय दरवाजावर नोटीस लावून सील केले होते. मात्र, त्या नोटीसीला अजय खोलकर गटाने केराची टोपली दाखवली आणि इमारत मालकाच्या उपस्थितीत सील तोडून कार्यालय खुले केले. खोलकर गटाने आमदार वीरीश बोरकर यांनी केलेले सर्व दावे फेटाळून लावले आणि कार्यालयात कोणाच्याही प्रवेशावर कोणतेही निर्बंध नसल्याचे सांगितले.

आरजीपीचे खजिनदार अजय खोलकर यांनी सांगितले की, योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून आणि कार्यालय मालकाच्या उपस्थितीत नोंदणीकृत कार्यालय सील तोडून कायदेशीररित्या पुन्हा सुरू करण्यात आले आहे. आमदार वीरीश बोरकर यांनी केलेले सर्व दावे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत, असेही खोलकर म्हणाले. खोलकर म्हणाले की, बोरकर यांनी लावलेली नोटीस पक्षाच्या लेटरहेडवर नव्हती.

नोटीसवर पार्टीचा लोगो नव्हता. त्यांनी ती नोटीस राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून वैयक्तिकरित्या व अन्य कुणाला पाठवून लावून घेतली असावी. बोरकर कार्यालयाला घर म्हणत असतील, तर त्यांनी घराला सील का ठोकले, असे विचारून खोलकर म्हणाले की, या कार्यालयाच्या करार आमच्याकडे असल्याने मालकाने आम्हाला सील तोडण्याची परवानगी दिली.

Viresh borkar strike goa
Goa News : आमदार निलेश काब्रालांमुळे मिळाले हक्काचे घर

...म्हणून केले कार्यालय सील : बोरकर

पक्षाच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याने कार्यालय सील करण्याचा आणि नोटीस लावण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे आरजीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार वीरीश बोरकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला सांगितले.

पक्षाची कागदपत्रे आणि मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी पक्षाच्या कार्यालयात अनधिकृत प्रवेश रोखण्याचे आणि कार्यालय सील करण्याचे आदेश जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगून बोरकर यांनी पक्षाची शिस्तपालन समिती उद्या जाहीर करण्यात येईल, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news