!-- afp header code starts here -->

Goa |गणेश मूर्तीशाळेतील कामात आमदार दंग, चतुर्थीला अवघेच दिवस शिल्लक

वेध गणेश चतुर्थीचे-आमदार प्रेमेंद्र शेट, गोविंद गावडे यांचा मूर्तीकामात सहभाग
गणेशमूर्तीच्या रंगकामात गुंतलेले आमदार गोविंद गावडे.
गणेशमूर्तीच्या रंगकामात गुंतलेले आमदार गोविंद गावडे.
Published on
Updated on

पणजी : राजकारणामध्ये राजकीय नेत्यांना फारसा वेळ मिळत नाही, असे म्हटले जाते. मात्र गोव्यातील अनेक राजकीय नेते, आमदार वेळात-वेळ काढून आपल्या कला जोपासताना दिसत आहेत.

मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट हे तर पारंपरिक मूर्तिकार घराण्यात जन्माला आलेले असल्याने ते गणेशमूर्ती बनवतात आणि मूर्तीचे रंगकामही करतात. तर प्रियोळचे आमदार गोविंद गावडे हे एक चांगले नाट्यकलाकार आहेतच पण त्याच सोबत चांगले रंगकर्मी आहेत.

दरवर्षी ते आमरखाणे केरी प्रियोळ येथील नंदा केरकर यांच्या गणेशमूर्ती चित्र शाळेत जाऊन तेथील गणेशमूर्ती रंगवतात. यावर्षीही ते गणेशमूर्तीना रंगवत आहेत. नंदा केरकर यांना गोविंद गावडे यांनी चिखल मळणे, रंककाम करणे यासाठी यंत्रे व अवजारे उपलब्ध करून दिली आहेत.

गणेशमूर्तीच्या रंगकामात गुंतलेले आमदार गोविंद गावडे.
Goa Staff Selection Commission Group C Recruitment 2026|गोवा कर्मचारी निवड आयोगातर्फे २१५ गट 'क' पदांसाठी भरती

मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून मूर्ती बनवतात. त्यांचे मोठे बंधू माजी सभापती अनंत शेट हे सुद्धा चिकणमातीच्या गणेश मूर्ती बनवतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रेमेंद्र शेट यांनी आपल्या चित्रशाळेत काही गणेशमूर्ती केल्या आहेत. व काहीना रंगही दिला आहे. मूर्तीशाळांतील कारागिर मूर्तीशाळेत कामात मन झाले आहेत.

गणेशमूर्तीच्या रंगकामात गुंतलेले आमदार गोविंद गावडे.
Goa -महिला शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान कधी होणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news